एक्स्प्लोर

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: राज ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची तासभर चर्चा; शिवसेना-मनसे युतीला लागणार ब्रेक? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Raj Thackeray Meets Devendra Fadnavis: फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचं संकेत मिळू लागले आहेत.

मुंबई :  राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena UBT) यांच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती. दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक होते, अशातच आज (गुरूवार 12 जून) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांची वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये झालेली गुप्त भेट चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. या भेटीमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - मनसे युतीला ब्रेक लागणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) सकाळी ताज लँड्स हॉटेलमध्ये पोहोचले, आणि अवघ्या काही मिनिटांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील त्या ठिकाणी दाखल झाले. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये त्या ठिकाणी कोणताही कार्यक्रम नसताना देवेंद्र फडणवीसांनी ही भेट घेतल्याने, यामागे राजकीय रणनीती असल्याचं संकेत मिळू लागले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. 10.35 मिनीटांनी फडणवीस हॉटेलमध्ये पोहोचले आणि पुन्हा 11.35 ला बाहेर पडले.

एक तासभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची बैठक पार पडली. मनसेचे अध्यक्ष हे 9.40 ला ताज लँड्स एंडमध्ये त्यांचा ताफा पोहचला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 10.35 ला पोहचले होते. कोणतेही शेड्यूल नसताना दोन्ही नेते मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटीसाठी पोहोचले. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असताना आता थेट राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट चर्चेचा विषय बनला आहे. भेटीनंतर दोन्ही नेते हॉटेलमधून बाहेर पडले. 

फडणवीस - ठाकरे भेटीचा राजकीय अर्थ काय?

या बैठकीत काय चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नसल्यामुळे भाजपने पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला जवळ करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सवाल उपस्थित होतोय. शिवसेना-मनसे युतीचं गणित बिघडवण्यासाठी हा राजकीय डाव होता का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. दरम्यान,देवेंद्र फडणवीस किंवा राज ठाकरे यांनी या भेटीबाबत अधिकृत वक्तव्य दिलं नसून, यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत होत्या. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या संभाव्य युतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून होते. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ही युती घडल्यास मोठे राजकीय समीकरण बदलू शकते, अशी चर्चा होती. मात्र, आता या सर्व चर्चांना राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त भेटीनंतर विराम मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे 
यांच्यातील संबंध अलीकडच्या काळात पुन्हा सुधारताना दिसले. दोघे एकत्र येऊन भाजप विरोधात ताकद उभी करणार, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता.

मात्र, या संभाव्य युतीला ‘ब्रेक’ लागण्याचं मुख्य कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘राजकीय टाइमिंग’ असल्याचं बोललं जातं. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव टाकणारे फडणवीस हे खेळाचे जाणकार रणनीतीकार मानले जातात. त्यांनीच राज ठाकरे यांना योग्य वेळ साधून भेट घेऊन युतीपासून परावृत्त केलं असावं, असा कयास बांधला जात आहे. ही भेट मुंबईत वांद्रे येथील हॉटेलमध्ये झाली असून, ती पूर्वनियोजित नसल्याची चर्चा आहे. 

सध्या मनसे भाजपच्या जवळ जातेय?

या भेटीनंतर मनसे पुन्हा एकदा भाजपच्या जवळ जातेय का, हा प्रश्न समोर आला आहे. जर राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यात युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असेल, तर ठाकरे गटाला आगामी निवडणुकीत मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.मएकूणच, महाराष्ट्रात आगामी महानगरपालिका निवडणुकांपूर्वीचे राजकारण चांगलेच तापले आहे, आणि या भेटींनी नवीन समीकरणांनाची उजळणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर
Pune Pashan Leopard News : पुण्यातील पाषाण - सुतारवाडी भागात बिबट्याचा संचार, नागरिकांमध्ये भीती
Election Politics : राजकराण बेभान, राडेबाजीला उधाण; मतदान झालं, गोंधळ सुरूच..Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
बँकेच्या लॉकरमधून शिवसेना नेत्याची रिव्हॉल्वर अन् दागिने गायब; माजी आमदाराची पोलिसांत धाव, बँकेकडून मिळेना प्रतिसाद
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
मोहम्मद शमी कुठाय? रोहित कोहलीवरूनही, गौतम गंभीर, अजित आगरकरांवर आगपाखड! गोलंदाजांची धुलाई पाहून कोणाच्या संतापाचा उद्रेक झाला?
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
प्रवाशांचे हाल, दिल्ली विमानतळावरुन रात्री 11.59 वाजेपर्यंतचे उड्डाण रद्द; इंडिगोचा माफीनामा, पॅसेंजरला आवाहन
Embed widget