एक्स्प्लोर

बर्फातला प्राणी बर्फात पाठवूया, संदीप देशपांडेंना वरळीत आणूया, आदित्य ठाकरेंविरोधात मनसेचे पोस्टर्स

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी (MNS posters) केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालानंतर (Lok Sabha Election result 2024) आणि विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मनसे (MNS vs Shiv Sena Worli) असा सामना रंगताना दिसत आहे. कारण आता वरळीत मनसे विरुद्ध आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी (MNS posters) केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत. याच पोस्टरच्या माध्यमातून विधानसभेसाठी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांना जिंकवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. 

आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटाचे वरळी विधानसभेतील (Worli Vidhan Sabha) विद्यमान आमदार आहेत. यंदा त्यांच्याविरोधात मनसेकडून संदीप देशपांडे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मागील 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे हे पहिल्यांदा निवडणुकीत उतरले होते. ठाकरे गटातील पहिली व्यक्ती निवडणूक लढत असल्याने, राज ठाकरे (Raj Thackeray MNS) यांनी त्यांच्याविरोधात कोणताही उमदेवार दिला नव्हता. 

वरळीतील पोस्टर्सवर नेमकं काय? 

वरळीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात पोस्टर्स लावले आहेत. त्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरेंविरोधात उल्लेख करण्यात आला आहे. बर्फातला प्राणी बर्फातच पाठवूया, जनमनातला आमदार, संदीप वरळीत आणूया. वरळीचे भावी आमदार संदीप देशपांडे सन्माननीय राज ठाकरे यांचा विश्वासू शिलेदार विधानसभेत पाठवूया यंदा वरळीकरांचं ठरलंय, असं या पोस्टर्सवर लिहिलं आहे.

राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्यावरुन टीकास्त्र 

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीविरोधात भूमिका घेत, भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावरुन मविआने त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरेंवर (Raj Thackeray) हल्लाबोल केला होता. 

उघड म्हणजे बिनशर्ट पाठिंबा

उद्धव ठाकरे नको म्हणून काही जणांनी उघड म्हणजे 'बिनशर्ट' पाठिंबा दिला, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर केला.  होता. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे स्पष्ट झालं. फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी उघड म्हणजे “बिनशर्ट” पाठींबा दिला, असं म्हणत उध्दव ठाकरेंनी राज ठाकरेंवर निशाणा साधला होता. 

अमित ठाकरे यांचं उद्धव ठाकरेंना उत्तर

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या या टीकेनंतर मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी केलेला विनोद समजायला दहा मिनिटे लागली. मात्र राज ठाकरेंनी (Raj Thackeray) वरळीत बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी मुलगा आदित्य ठाकरेंना आमदार बनवताना काही वाटलं नाही का? असा सवाल अमित ठाकरे यांनी केला होता.  

संबंधित बातम्या 

Amit Thackeray: अमित ठाकरेंचं पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंना उत्तर, म्हणाले, वरळीत बिनशर्त पाठिंबा घेतला, मुलाला आमदार केलं, ते विसरु नका!   

Video: मनसे म्हणते, वरळीत तुम्हाला हरवणार, आदित्य ठाकरेंचं उत्तर, म्हणाले आधी शर्ट घालून यायला सांगा! 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीलाPorsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget