Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी पाऊस सुरु होताच सातारच्या सभेच्या आठवणी जाग्या; कार्यकर्ते म्हणाले, हा विजयाचा शुभसंकेत!
Maharashtra Poliitcs: सभेत भाषण सुरु असताना पाऊस पडला, आता सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ठाम विश्वास. अनेक कार्यकर्त्यांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.
![Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी पाऊस सुरु होताच सातारच्या सभेच्या आठवणी जाग्या; कार्यकर्ते म्हणाले, हा विजयाचा शुभसंकेत! Rain started during Sunetra Pawar rally in Mulshi NCP Ajit Pawar camp workers relate it with sharad pawar rain speech in Satara Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांच्या भाषणावेळी पाऊस सुरु होताच सातारच्या सभेच्या आठवणी जाग्या; कार्यकर्ते म्हणाले, हा विजयाचा शुभसंकेत!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/30/09fa7cc9bc57d813fd3229c7f25051821711810090733954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांनी शनिवारी मुळशी परिसराचा दौरा केला. यावेळी सुनेत्रा पवार भाषण करत असताना रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या प्रसंगामुळे अनेकांना 2019 साली शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या सभेत पाऊस पडला त्याअर्थी सुनेत्रा पवार यांनाही बारामतीमध्ये 100 टक्के विजय मिळणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. भुकुम येथील एका सोसायटीत संवाद कार्यक्रमात सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या भाषणावेळीच रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पाऊसधारा म्हणजे आपल्यावर झालेली कृपा आहे, असे म्हणत सुनेत्रा पवार यांनी भाषण न थांबवता रिमझिम पावसातही उपस्थित नागरिकांशी संवाद साधला.
मुळशीचा दौरा आटोपल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्हाला लोकांमध्ये उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण दिसत असेल. बारामतीची निवडणूक ही कौंटुबिक नाही, तर राष्ट्राची निवडणूक आहे. माझ्यादृष्टीने या निवडणुकीत महिला सक्षमीकरण, तरुणांचे रोजगार, शिक्षण, शेतकऱ्यांच्या समस्या आणि पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे त्यांनी म्हटले. मात्र, उन्हाळा सुरु झाल्यानंतरही राज्य सरकारने दुष्काळाबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यासाठी तुम्ही काय करणार, असे सुनेत्रा पवार यांना विचारण्यात आले. त्यावर सुनेत्रा पवार यांनी म्हटले की, मी याबाबत माहिती घेऊन बोलेन.
अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच, दिंडोरीत भारती पवारांविरोधात भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर!
बारामतीमध्ये लोकांना चेंज हवाय: सुनेत्रा पवार
बारामती मतदारसंघातील लोकांचा उत्साह पाहता लोकांना बदल हवाय, असे वाटत आहे. अजितदादांनी वेगळी भूमिका मांडली. त्यामुळे लोकांना नेतृत्त्वबदल हवा, असे चित्र सध्या दिसत आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाची बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून भिगवण चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यामुळे बारामती लोकसभेत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. यावेळी सुनेत्रा पवार पवार आणि अजित पवार यांच्या समर्थन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)