आर्थिक परिस्थितीवरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा, 2014 ते 2022 पर्यंतची आकडेवारी केली ट्वीट
Rahul Gandhi On Inflation: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यासोबतच महागाई आणि बेरोजगारीवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
Rahul Gandhi On Inflation: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आर्थिक परिस्थितीवरून नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यासोबतच महागाई आणि बेरोजगारीवरूनही त्यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यांनी काही आकडे शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 2014 ते 2022 या वर्षाचा उल्लेख केला आहे. ट्विटरवर ही आकडेवारी शेअर करत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, भारत सरकारचे 2014 मध्ये 56 लाख कोटींचे कर्ज होते ते 2022 मध्ये 139 लाख कोटींवर पोहोचले आहे. याशिवाय ते म्हणाले की, जर आपण दरडोई कर्जाबद्दल बोललो तर जे 2014 मध्ये 44,348 होते, ते 2022 पर्यंत 1,01,048 रुपयांवर पोहोचले आहे. त्याचबरोबर बेरोजगारीची आकडेवारी मांडताना त्यांनी 2014 साली 4.7 टक्के बेरोजगारी होती. ती 2022 मध्ये 7.8 टक्क्यांवर पोहोचल्याचे सांगितले आहे.
When ‘Egonomics' trumps ‘Economics’... pic.twitter.com/F6mHRl2KlJ
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 13, 2022
या सर्व गोष्टींसोबतच राहुल गांधींनी गॅस सिलिंडर, व्यापार तूट आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यांचाही उल्लेख केला आहे. त्यांनी ट्वीट करून सांगितले की, 2014 साली डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 59 होती, जी 2022 मध्ये 80 रुपये झाली आहे. 2014 मध्ये 410 रुपयांना मिळणारा सिलेंडर 2022 पर्यंत 1053 रुपयांचा झाला. यासोबतच ते म्हणाले की, 2014 मध्ये व्यापार तूट 135 अब्ज डॉलर्स इतकी होती, ती 2022 मध्ये 190 बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Free Booster Dose : 18 वर्षांवरील नागरिकांना पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Ram Setu : राम सेतूला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याची मागणी; 26 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी