Delhi Congress Resolution: राहुल गांधीच काँग्रेस अध्यक्ष, दिल्ली काँग्रेसने मंजूर केला ठराव
Resolution to Make Rahul Gandhi Party President: खासदार राहुल गांधी हे पुन्हा काँग्रेस पक्षाध्यक्ष होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Resolution to Make Rahul Gandhi Party President: खासदार राहुल गांधी हे पुन्हा काँग्रेस पक्षाध्यक्ष होणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशातच दिल्ली प्रदेश (Delhi Congress) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनिल कुमार यांनी सांगितले की, प्रदेश (दिल्ली) काँग्रेसने रविवारी राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती करणारा ठराव एकमताने मंजूर केला. दोन दिवसीय 'नव संकल्प शिबिर'मध्ये हा ठराव मंजूर करण्यात आल्याचे कुमार यांनी सांगितले.
दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीने मंजूर केलेल्या ठरावात म्हटले आहे की, ''पक्षाच्या आव्हानात्मक काळात राहुल गांधींसारखा (Rahul Gandhi) नेताच अशा वेळी काँग्रेसला मजबूत आणि पुनरुज्जीवन करू शकतो''. कुमार म्हणाले, "राजिंदर नगर पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रेम लता यांनीही नव संकल्प शिबिरात भाग घेतला होता. त्यांच्या विजयाची खात्री करण्यासाठी तळागाळातील स्तरापासून ते सर्वोच्च नेतृत्वापर्यंतचे काँग्रेस कार्यकर्ते स्थानिक लोकांपर्यंत जाऊन भाजप आणि आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचाराबद्दल सांगतील'', असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, अनेक ज्येष्ठ नेत्यांनी स्वेच्छेने बूथ टेबल सांभाळण्यासाठी आणि काँग्रेस उमेदवाराला लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काम केले आहे, हे पाहून आनंद वाटतो. कुमार यांच्याशिवाय दिल्ली काँग्रेसचे प्रभारी शक्ती सिंह गोहिल, माजी खासदार रमेश कुमार आणि उदित राज, दिल्लीचे माजी मंत्री हारून युसूफ, डॉ किरण वालिया आणि नरेंद्र नाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Nana Patole : महाराष्ट्रात एक कोटी तरुणांना रोजगार देणार ; नाना पटोलेंची माहिती
- राष्ट्रवादीचा विखे पाटलांना धक्का; 20 वर्षांनंतर गावातील सत्ता गेली, लोणी खुर्द सोसायटी निवडणुकीत परिवर्तन
- उद्धव ठाकरेंचा सगळ्यात मोठा कलेक्शन एजंट अनिल परब, लवकरच अनिल देशमुख शेजारी जातील - किरीट सोमय्या
- मनसेचं मत कुणाला? राजू पाटील म्हणतात राज साहेबांच्या आदेशाप्रमाणेचं मतदान करणार