एक्स्प्लोर

Prithviraj Chavan: आंदोलनामुळे मोदी पॅनिक झाले, त्यांना नमतं घ्यावं लागलं; 'बिगिनिंग इज द एंड'; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

देशाने यापूर्वी अनेक आंदोलनं बघितली आहे. मात्र अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांनी उभं केलेलं हे देशव्यापी आंदोलन पहिल्यांदाच अनुभवलं त्यामुळे मोदींना नमतं घ्यावं लागलं, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

Prithviraj Chavan on Dharmendra Pradhan Resignation : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा (Dharmendra Pradhan Resignation) म्हणजे खरंतर लोकशाहीचा प्रचंड मोठा विजय आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) तो स्वीकारला की नाही? ते अजून कळलेलं नाही. शिवाय त्या संदर्भात पर्यायी व्यवस्था आणि जबाबदारी अजून कुणाकडे दिली आहे, हे देखील कळायचं बाकी आहे. पण विद्यार्थी ताकद आणि युवाशक्तीचा आज मोठा विजय झाला आहे. विरोधी पक्षांच्या एकजुटीचा हा विजय झालेला आहे.अशी प्रतिक्रिया अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिली आहे. (Prithviraj Chavan on Dharmendra Pradhan Resignation)

दरम्यान, मला वाटतं की हा राजीनामा जर संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी झाला असता तर कदाचित संसदेचे अधिवेशन सुरळीतपणे चालवलं गेलं असतं. सोबतच हा मोदी सरकारच्या कार्यकाळातील जबाबदारी स्वीकारून दिलेला पहिला राजीनामा आहे आणि मला वाटतं या एकाच वाक्यात वर्णन करायच झालं तर 'बिगिनिंग इज द एंड' (Beginning is the end)' असे करता येईल, असेही ते म्हणाले. तर यापुढे मोदी सरकार चालणार नाही. युवाशक्ती मोदी सरकारला उलवून टाकल्याशिवाय राहणार नाही. असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

Prithviraj Chavan: .... देशव्यापी युवांची ताकद, आंदोलनापुढे मोदींना नमतं घ्यावं लागलं

देशाने यापूर्वी अनेक आंदोलनं बघितली आहे. मात्र अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांनी उभं केलेलं हे देशव्यापी आंदोलन पहिल्यांदाच अनुभवले आहे. आपण मंडलच्या वेळेच आंदोलन पाहिलं, गुजरात मधलं विद्यार्थ्यांच आंदोलन पाहिलं आणि इतर शेतकऱ्यांची आंदोलन पाहिली. मात्र देशव्यापी युवांची ताकद यातून दिसून आली. आंदोलन कुठल्याही विभागाचं किंवा जातीचं, धर्माचे, भाषेचं हे आंदोलन नव्हतं. त्यामुळे या आंदोलनापुढे मोदींना नमतं घ्यावं लागलं, असेही पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले.

Prithviraj Chavan: फास्टट्रॅक कोर्टचा काहीही उपयोग होणार नाही, ती केवळ तात्पुरती मलमपट्टी

परिणामी, पंतप्रधान मोदी पॅनिकमोड मध्ये गेलेले आहेत. ते मध्यरात्री व्हिडिओ प्रसारित करून युवकांना संबोधित करतात. मात्र हीच गोष्ट तुम्ही आधी का केली नाही. मोदींच्या कार्यकाळात 142 पेपर लीग झाले आहेत. याला राजकीय पाठबळ मिळालं होतं, प्रचंड मोठा माफिया यामागे काम करत होता. त्यामुळे यामागे कुणाचं संरक्षण होतं, हे शोधलं पाहिजे. शिवाय फास्टट्रॅक कोर्टचा काहीही उपयोग होणार नाही. ती केवळ तात्पुरती मलमपट्टी आहे. त्यामुळे मूलभूत सुधारणा करणे सरकारला आता आवश्यक आहे. न केल्यास जनतेच्या आणि युवाशक्तीच्या प्रचंड मोठ्या असंतोष आणि रोषाला या सरकारला पुन्हा सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Satara Politics: शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावे; जयकुमार गोरेंच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण; तर शेखर गोरेंची सातारा जिल्हा बँकेसाठी पुन्हा तयारी
Manoj Jarange Patil: 28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
28 ऑगस्टच्या आत सर्व मागण्या पूर्ण करा, अन्यथा 29 ऑगस्टनंतर सरकारची जिरवणार; मनोज जरांगेंचा थेट इशारा
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Advertisement

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget