एक्स्प्लोर

Independence Day 2022: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी उद्या करणार देशाला संबोधित, 'या' मुद्द्यांवर देऊ शकतात भाषण

PM Narendra Modi on Independence Day: देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे.

PM Narendra Modi on Independence Day: देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव  (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागले आहे. गेल्या 75 वर्षात भारत कोणत्या कठीण काळातून गेला आणि आज तो जगाला कशा प्रकारे दिशा दाखवत आहे, याचा उल्लेख पंतप्रधान आपल्या भाषणात करू शकतात.

लाल किल्ल्यावरून 76 व्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि मेक इन इंडियाच्या योगदानाबद्दल बोलू शकतात. कोरोनाच्या काळात पंतप्रधानांनी आत्मनिर्भर भारतावर भर दिला होता. त्यांनी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टवर भर दिला होता. जगभरातील निर्देशांक देखील भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचे दर्शवत आहेत.

डिजिटल पेमेंटचा करू शकतात उल्लेख 

आज डिजिटल पेमेंटच्या क्षेत्रात भारत गेल्या काही वर्षांत जगात पहिल्या क्रमांकावर आहे. 2021-22 मध्ये 7,422 कोटी रुपयांच्या व्यवहारांसह भारत डिजिटल पेमेंट इकोसिस्टममध्ये पहिल्या क्रमांकावर आला आहे. पंतप्रधान आपल्या भाषणात भारताच्या या कामगिरीची चर्चा करू शकतात. युक्रेन युद्ध असो किंवा जागतिक मंदी, भारत अजूनही त्याच्या प्रभावापासून दूर आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या या ताकदीवर आणि लवचिकतेवर पंतप्रधान आपल्या भाषणात बोलू शकतात.

लाल किल्ल्यावरून आपल्या भाषणात पंतप्रधान मोदी कोरोनाच्या काळात भारताच्या आरोग्य क्षेत्रातील अनेक सुधारणांचा उल्लेख करू शकतात. देशातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांटपासून व्हेंटिलेटरची उपलब्धता वाढली आहे, यावरही पंतप्रधान बोलू शकतात. कोरोना लस आणि जगातील सर्वात मोठा लसीकरण करणारा देश म्हणून भारताचे यश, त्यात नागरिकांचे सहकार्य यांचाही पंतप्रधान उल्लेख करू शकतात.

76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात त्या हुतात्म्यांचे विशेष स्मरण करतील, ज्यांच्या हौतात्म्याशिवाय स्वातंत्र्य मिळणे शक्य नव्हते. तसेच 'हर घर तिरंगा' मोहिमेचाही पंतप्रधान उल्लेख करू शकतात. या मोहिमेअंतर्गत देशातील 27 कोटी घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे.

पंतप्रधान मोदी क्रीडा क्षेत्रातील भारताच्या वाढत्या पराक्रमाचाही उल्लेख करू शकतात. अलीकडेच भारताने CWG गेम्समध्ये 22 सुवर्णांसह 61 पदके जिंकली आहेत. भारताचे खेळाडू प्रत्येक मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नवीन खेळांमध्ये पदके जिंकत आहेत. देशासमोर विशेषत: क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंच्या वाढत्या योगदानाचाही पंतप्रधान उल्लेख करू शकतात.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषणBeed  DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थितRaj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरेRaj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
प्रवासी विमान आणि अमेरिकन लष्कराचं हेलिकाॅप्टर भीषण धडकेत थेट नदीत कोसळले, 18 मृतदेह सापडले; हाड गोठवणाऱ्या थंडीत शोधकार्य सुरुच
Budget 2025 : आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला, पहिलं नाव इंदिरा गांधी यांचं, निर्मला सीतारामन आठव्यांदा बजेट मांडणार
आतापर्यंत दोन महिला अर्थमंत्र्यांनी देशाचं बजेट मांडलं, इंदिरा गांधींनंतर निर्मला सीतारामन यांना बहुमान
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
छावा सिनेमा, विधानसभा निकाल, चंद्रकात पाटील ते अजित पवार; राज ठाकरेंच्या भाषणातील 10 मुद्दे; मुंबईतून फटकेबाजी
Ajit Pawar in Beed: बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हायव्होल्टेज ड्रामा, अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
लई मागचं बोलू नका; बीडमधील डीपीडीसीच्या बैठकीत अजित पवारांनी सुरेश धस यांना सुनावलं
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
उद्धव ठाकरेंच्या सेनेची लांगूलचालनाची भूमिका मतांच्या लाचारीसाठी, वक्फ बिलावरून देवेंद्र फडणवीसांचे प्रत्यूत्तर
Raj Thackeray : फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
फडणवीसांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले नेते त्यांच्याच मंत्रीमंडळात; राज ठाकरेंनी आरोप होताच भाजपवासी झालेल्या राज्यातील नेत्यांची कुंडलीच मांडली!
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट,  फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट, फडणवीस म्हणाले लग्नात भेटल्यामुळं युती होते इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये
Raj Thackeray: 1 खासदार असणारे अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात, राज ठाकरेंनी गणित मांडलं,  विधानसभा निकालाची पिसं काढली!
विधानसभेचा निकाल शॉकिंग, अजित पवार 42 जागा कसे जिंकू शकतात? राज ठाकरेंना संशय
Embed widget