संजय राऊतांचं गडकरींसंदर्भातलं वक्तव्य म्हणजे, मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
Pravin Darekar on Sanjay Raut: 4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल, असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
Pravin Darekar on Sanjay Raut : मुंबई : 4 जूननंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांचं थोबाड फुटलेलं दिसेल, अशी टिका भाजप नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे. संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, आपल्या घराची काळजी करावी, हा देश मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, असं म्हणत संजय राऊतांवर प्रवीण दरेकरांनी पलटवार केला आहे.
चार जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : प्रविण दरेकर
भाजप नेते प्रविण दरेकर म्हणाले की, "4 जूननंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला दिसेल. कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत, देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे. हे जाहीर सभांमधून अगदी ठणकावून सांगितलं आहे. त्यामुळे मोदी-योगी असं चित्र उभं करू नका. संजय राऊत तुम्ही आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी करा. हा देश, आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल, हे सर्वश्रुत आहे. संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारच शोधून शोधून, काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न करतात."
गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस : प्रविण दरेकर
"सामनाच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही. गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे, संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस. कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी आणखी विजय भक्कम व्हावा, यासाठी काय योगदान दिलं आहे ते नागपूरवासियांना माहीत आहे. संजय राऊत यांची दुटप्पी भूमिका आहे. अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली, नंतर बोलायचं प्रचारात उतरले, संजय राऊत टीका करताना सुद्धा काय नेमकं बोलायचंय, हे निश्चित करून घ्या.", असं प्रविण दरेकर म्हणाले आहेत.
पाहा व्हिडीओ : Pravin Darekar On Sanjay Raut : 4 जूनच्या निकालानंतर राऊतांचं थोबाड फुटलेलं दिसेल : दरेकर