एक्स्प्लोर

मोहिते-पाटलांशी पॅच अप करण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न, अजून तरी तुतारी हाती घेतलेली नाही, भाजप नेत्याचा गौप्यस्फोट

Vijaysinh Mohite–Patil and Prashant Paricharak : मोहिते पाटील कुटुंबासोबत गेल्या 40 वर्षांपासून आम्ही कौटुंबिक संबंध  ठेवून आहोत

Prashant Paricharak on Vijaysinh Mohite–Patil : "मोहिते पाटील कुटुंबासोबत गेल्या 40 वर्षांपासून आम्ही कौटुंबिक संबंध  ठेवून आहोत , माध्यमे म्हणत असली तरी अजून त्यांनी अधिकृतपणे तुतारी हातात घेतलेली नाही. भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि मोहिते कुटुंबासोबत अजूनही पॅच अपचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जी टीम भाजप सोबत होती तीच टीम 2024 मध्येही निंबाळकर यांच्या सोबत आहे", असा गौप्यस्फोट भाजप नेते प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनी केला. 

मोहिते पाटील कोणता निर्णय घेणार?

खासदार रणजित निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आज (दि.7) पंढरपूर तालुक्यातील 57 गावात जिल्हा परिषद गटानुसार प्रशांत परिचारक यांनी बैठक बोलावल्या होत्या. यावेळी परिचारक बोलत होते. परिचारक यांच्याकडे माढा , सोलापूर आणि सांगली या तीन लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपने दिलेली आहे. त्यामुळे परिचारक (Prashant Paricharak) यांच्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा मोहिते पाटील काय करणार हा प्रश्न उभा राहिला आहे. 

राष्ट्रवादी आल्याने मतांच्या संख्येत मोठी वाढ होईल

माढा लोकसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील 57 गावे असून जवळपास 150 बुथ आहेत.  पंढरपूर तालुक्यातील दीड ते पावणेदोन लाख मतदान या तालुक्यात असल्याने आज खासदार रणजित निंबाळकर यांनी दिवसभर या गावातील प्रश्न आणि अडचणी ऐकून घेतल्या. यावेळी बोलताना निवडणुकीत भाजपसोबत शिवसेना होती. मात्र, आता राष्ट्रवादी आल्याने मतांच्या संख्येत मोठी वाढ होईल, असा दावाही रणजितसिंह निंबाळकर यांनी केला. 

नवीन माणसे जवळ येताना एकही जुना नेता अथवा कार्यकर्ता दूर जाऊ नये

गेल्यावेळी निंबाळकर हे नवखे उमेदवार होते पण आता पाच वर्षात त्यांनी भरपूर काम करून नवनवीन कार्यकर्ते जोडले आहेत. त्यामुळे  माढा लोकसभा भाजप मोठ्या मताधिक्याने जिंकेल,असे परिचारक यांनी सांगितले. नवीन माणसे जवळ येताना एकही जुना नेता अथवा कार्यकर्ता दूर जाऊ नये असे भाजपचे प्रयत्न असल्याचे परिचारक (Prashant Paricharak) यांनी सांगितले. पंढरपूर तालुक्यातील या गावांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या असून या मतदारांचा विश्वास प्रशांत परिचारक यांच्यावर आहे. ते आमचे निवडणूक प्रमुख असल्याने या भागातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार रणजित निंबाळकर यांनी व्यक्त केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

माझ्याकडे ना कारखाना, ना बँक, ना सोसायटी, मला ना ईडीची भीती ना सीबीआयची, प्रणिती शिंदेंची सोलापुरात आर-पारची लढाई

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEOEknath Shinde Sports Car : सिंघानियांनी गरगर कार फिरवली..एकनाथ शिंदे म्हणाले, मला भीती वाटते!Thane Eknath Shinde At Raymond vintage Car Exhibition : एकनाथ शिंदे यांनी अनुभवलं कार ड्रिफ्टिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News : मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
मेळघाटातील 'त्या' चौघी पंधरा दिवसांच्या रजेवर; वनअधिकाऱ्यांकडून हत्तींना विशेष रजा मंजूर 
Eknath Shinde : ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीगाठी, एकनाथ शिंदेंचा जोरदार टोला; म्हणाले, सरडे रंग बदलतात, पण एवढ्या वेगाने...
Nashik News : आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
आमदार सुहास कांदे यांच्या अंगरक्षकाने हॉटेल कर्मचाऱ्याला दाखवला बंदुकीचा धाक, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Walmik Karad : काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
काल मोक्यातून सुटला, पण आज वाल्मिक कराडला झटका; सीआयडीत कोठडीत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचा 'चाप' ओढला
Mumbai Police : मुन्नाभाई MBBS स्टाईलनं कॉपी करायला गेला अन् हाती बेड्या पडल्या, मुंबई पोलिसांकडून  तरुणाला अटक
मुंबई पोलिसांकडून 'मुन्नाभाई MBBS' चा गेम, तरुणाला लेखी परीक्षेत हायटेक कॉपी करणं भोवलं, थेट तुरुंगात टाकलं
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
सरकार येऊनही फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हावं लागलं त्यावेळी डोळ्यात पाणी आलं होतं, चंद्रशेखर बावनकुळेचं वक्तव्य
Bangladesh Squad Champions Trophy : बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
बोर्डाचा कठोर निर्णय! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून माजी कर्णधाराचा पत्ता कट; जाणून घ्या संपूर्ण टीम
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचं घडलंय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या दादांवर फैरींवर फैरी!
दादा अख्खा महाराष्ट्र म्हणतोय, चुकीचा पायंडा मांडू नका, विषवल्ली मोडण्यासाठी प्रखर भूमिका घ्या; विजय बापू शिवतारेंच्या फैरींवर फैरी!
Embed widget