एक्स्प्लोर

प्रशांत परिचारकांचा गावभेट दौरा सुरु, आमदार आवताडेंचं टेन्शन वाढलं, पंढरपूरमध्ये भाजपमध्ये बंडखोरी होणार?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा (Pandharpur Mangalwedha vidhan sabha) मतदारसंघात प्रशांत परिचारक यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय.

Pandharpur Mangalwedha vidhan sabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभा (Pandharpur Mangalwedha vidhan sabha) मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) हे अपक्ष किंवा तुतारी घेऊन निवडणूक रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झालं आहे. आजपासून प्रशांत परिचारक यांनी गाव भेट दौऱ्याला सुरुवात देखील केली आहे. त्यांच्या या दौऱ्याला कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. यामुळं भाजप आमदार समाधान अवताडे (Samadhan Awatade) यांचं टेन्शन वाढल्याचं बोललं जात आहे. 

आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास परिचारक अनुपस्थित 

पंढरपूर व मंगळवेढा या दोन्ही तालुक्यातून कार्यकर्त्यांनी तुतारी किंवा अपक्ष  रिंगणात उतरायचा आग्रह धरल्याने परिचारक यांनी  गाव भेट दौरा सुरु केला आहे. दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप आमदार समाधान अवताडे यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यास परिचारक अनुपस्थित राहिले होते. या मेळाव्यात विद्यमान आमदार समाधान अवताडे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद पक्षाला दाखवून दिली होती. त्यामुळं याच मेळाव्यात फडणवीसांनी आमदार समाधान अवताडे यांना ताकद देण्याचे आवाहन केल्याने परिचारक समर्थक नाराज  झाले होते. 

तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार?

दरम्यान, आता प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात उतरण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळं भाजप आमदार समाधान अवताडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भाजपकडून समाधान आवताडे तर महाविकास आघाडी कडून भगीरथ भालके किंवा अनिल सावंत या दोघांची नावे चर्चेत आहेत. अशातच आता परिचारकही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आल्याने तुतारीची उमेदवारी कोणाला मिळणार? याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पंढरपुरात बहुरंगी लढत होणार

यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत अवताडे आणि परिचारक हे दोघेही निवडणूक रिंगणात असणार असून परिचारक महाविकास आघाडीतून उभारणार की अपक्ष हेही लवकरच समोर येईल. गेल्यावेळी 2021 साली दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत आमदार अवताडे यांना विजयी करण्यासाठी भाजप नेत्यांनी परिचारक यांना अवताडेंच्या पाठिशी उभे राहण्याचे सांगितले, ज्यामुळे भाजपने ही जागा जिंकली होती. आता,  परिचारक आणि अवताडे हे दोघेही रिंगणात उतरल्यास भाजपच्या अडचणी वाढणार आहेत. गेल्या वेळी थोडक्या मतात पराभूत झालेले भगीरथ भालके यांनीही महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितल्याने येथील लढत बहुरंगी होणार हे नक्की. त्यामुळे, पंढरीच्या बहुरंगी लढतीत आमदार समाधान अवताडे हे आपली आमदारकी टिकविण्यासाठी जोरदार तयारीला लागल्याचे दिसून येते.

महत्वाच्या बातम्या:

Vidhansabha Election : भाजपचे आजी-माजी आमदार आमने-सामने ; लाडक्या बहि‍णींना कुणी साड्या वाटल्या, कुणी सायकली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधनABP Majha Headlines : 10 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP MajhaMajha Infra Vision Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजनABP Majha Headlines : 09 PM च्या हेडलाईन्स एबीपी माझा ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
रतन टाटा हे भारताचा अभिमान, त्यांच्या जाण्यानं दुर्मिळ रत्न हरपले :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
देशसेवेसाठी आयुष्य वाहणारं व्यक्तिमत्व हरपलं, रतन टाटा यांच्या जाण्यानं विविध क्षेत्रात हळहळ
Ratan Tata Passes Away : उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
Ratan Tata : चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
चार वेळा प्रेमात पडले पण आयुष्यभर सिंगलच राहिले, रतन टाटांची लव्हस्टोरी तुम्हाला माहितेय का? 
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
शिंदे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक; नॉन क्रिमिलियरसह अनेक मोठे निर्णय होणार
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
उद्योगपती रतन टाटा यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू; मुंबईतील रुग्णालयात डॉक्टरांची टीम तैनात
Pune Mhada: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली; सोलापूर, कोल्हापूर अन् सांगलीतही घरं
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
विमान उडालं अन् पुन्हा मुंबईत परत फिरलं; रामदास आठवलेंची उड्डाण मंत्रालयाकडे तक्रार
Embed widget