दोन-दोन खासदार निवडले, पण कामाच्या कोऱ्या पाट्या, आता उपरा आणून ठेवलाय, प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल
Praniti Shinde on Ram Satpute, Pandharpur : दोन-दोन खासदार निवडले. पण कामाच्या कोऱ्य पाट्या आहेत. अनुभव नाही, काम नाही. तरिही तुम्ही मोठ्या मनाने त्यांना निवडून आणलय.
गुजरातचा कांदा बाहेर जातोय पण महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय
प्रणिती शिंदे म्हणाल्या, मायबाप शेतकऱ्यांनी मला हिंमत दिली आहे. मला अनेक गावातील शेतकरी मायबाप म्हणाले की, आम्ही ठरवलंय आमचं ठरलंय भाजपविरोधातच मतदान करायच आहे. गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांना त्रास झालाय. गावागावात पाणी नाहीये. उजनीचं नियोजन नाहीये. कांदा निर्यात बंद केलीये. गुजरातचा कांदा बाहेर जातोय पण महाराष्ट्रावर अन्याय केला जातोय. जीएसटीच राक्षस उरावर येऊन बसलंय. 15 लाखांच्या अमिषामुळे 10 वर्षे मागे गेलो आहेत. हे पाप भारतीय जनता पक्षाचे आहे. तुमच्या मताची भाजपला किंमत राहिलेले नाही. आणखी किती अपमान सहन करणार आहात ? आता येऊन म्हणतात उमेदवाराकडे बघूच नका. पंतप्रधानांकडे बघा म्हणतात. दोघांना काय दिवे लावलेत? असे सवालही प्रणिती शिंदे यांनी यावेळी उपस्थित केले.
पर्वा खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं
पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, पंतप्रधानांचे पर्वाचे भाषण ऐकले असेल कामाबद्दल बोलत नाहीयेत. मुद्यावर बोलत नाहीत. मुद्यावर येत नाहीत. मागील दहा वर्षात सोलापूरला काय केले? हे सांगत नाहीयेत. फक्त जाती पातीची आणि धर्मची कीड भारतीय जनता पक्षाने देशाला लावली आहे. आपल्या लोकशाहीला दृष्ट लावली आहे. पंतप्रधान देशाला संभाळणार असला पाहिजे. तो पक्षाचा नसतो देशाचा असतो. पर्वा खालच्या पातळीवर जाऊन भाषण केलं. रामाचे मंदिर बांधले यांचे स्वागत करतो. कधीतरी विठू माऊलीबरोबर सेल्फी करा. फक्त समाजात तेढ निर्माण करतात. एकी बिघडवण्याचा तुम्हाला अधिकार नाही. पोलिसांना मी सलाम करते. राज्यकर्ते तेढ निर्माण करतात, पण पोलीस ते सांभाळतात. ही लढाई एकट्याची नाही. ही आपल्या सर्वांची लढाई आहे. संविधान बदलण्याची भाषा करतात, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या