एक्स्प्लोर

West Bengal : बंगालच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये आयुष्मान योजनेला मंजुरी, घुसखोरांवर कडक कारवाई; विजयी भाषणात पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा

West Bengal Election Result : पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीतील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या घोषणा केल्या. आयुष्मान योजना लागू करण्यासह घुसखोरीविरोधात कडक कारवाईचे संकेत दिले.

West Bengal Election Result : पश्चिम बंगालमधील विजय हा ऐतिहासिक आहे. पहिल्याच कॅबिनेटमध्ये आयुष्यामान भारत योजेनेला मंजुरी दिली जाईल आणि बांग्लादेशी घुसखोरांवर कडक कारवाई केली जाईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुडुचेरीमध्ये मिळालेल्या प्रचंड विजयानंतर दिल्लीत भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत मोठ्या घोषणा केल्या. त्यांच्या आगमनावेळी ‘मोदी मोदी’ आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करत हा विजय ऐतिहासिक असल्याचे म्हटले. वर्षानुवर्षांची साधना आज यशात परिवर्तित झाली आहे. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मीही आनंदित आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पाचही राज्यांतील जनतेचे आभार मानत हा दिवस देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

PM Modi Announcement : आयुष्मान योजना आणि घुसखोरीवर निर्णय

मोदींनी पश्चिम बंगालमधील पहिल्या कॅबिनेट बैठकीत आयुष्मान योजनेला मंजुरी दिली जाईल, असे स्पष्ट केले. यासोबतच राज्यातील घुसखोरीच्या प्रश्नावर कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला. बंगाल आता भयमुक्त होईल आणि विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

PM Modi Democracy Statement : भारताच्या लोकशाहीची ताकद

भाषणादरम्यान मोदींनी भारताच्या लोकशाही प्रक्रियेचे कौतुक केले. जय-पराजय हा लोकशाहीचा भाग आहे. पण या निवडणुकांनी संपूर्ण जगाला भारताची लोकशाही किती मजबूत आहे हे दाखवून दिले, असे ते म्हणाले. त्यांनी उच्च मतदान टक्केवारीचा उल्लेख करत निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व घटकांचे आभार मानले.

PM Modi Ganga Remark : गंगा आणि ब्रह्मपुत्रेचा उल्लेख

आपल्या भाषणात भावनिक संदर्भ देत 'मला कोणी पाठवले नाही, मला गंगा मातेनं बोलावले' असं पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांनी गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उल्लेख करत पूर्व भारताच्या विकासासाठी मोठे पाऊल उचलले जाईल, असे संकेत दिले.

Bengal Victory Impact : बंगालमध्ये बदलाचे संकेत

या विजयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. दीर्घकाळ चालत आलेल्या सत्तेला धक्का देत नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात झाली आहे. आगामी काळात विकास आणि प्रशासनाच्या नव्या धोरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
शिंदे-फडणवीसांनी चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील; मनोज जरांगे पुन्हा भडकले
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही, कोणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, जरांगे पाटलांच्या टिकेनंतर मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा
न्यायालय एकनाथ शिंदेंच्याच बाजूने निर्णय देणार, धनुष्यबाण पेलण्याची ताकद फक्त शिंदेंसाहेबांमध्येच, बच्चू कडूंचा दावा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget