PM Modi Mother Heeraben Death Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अनंतात विलीन
PM Narendra Modi Mother Heeraben Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचं आज निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
LIVE
Background
PM Narendra Modi Mother Heeraben Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं आज (30 डिसेंबर) निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून हिराबेन यांच्यावर अहमदाबादच्या (Ahmedabad) यूएन मेहता रुग्णालयात (U N Mehta Hospital Ahmedabad) उपचार सुरु होते. आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली
18 जून रोजी हिराबेन यांनी साजरा केला होता 100 वा वाढदिवस
हिराबेन यांनी 18 जून 2022 रोजी आपला 100 वा वाढदिवस साजरा केला होता. आईच्या निधनाची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहमदाबादकडे रवाना झाले आहेत.
आईमध्ये नेहमीच त्रिमूर्तीचा भास व्हायचा : नरेंद्र मोदी
हिराबेन यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रुग्णालयात येऊन आईची विचारपूस केली होती. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज त्यांचे निधन झालं. आईच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है। pic.twitter.com/yE5xwRogJi
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2022
मोदींनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये जाऊन घेतली होती आईची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये आई हिराबेन यांची भेट घेतली होती. पंतप्रधान मोदींनी आईसोबत बराच वेळ गप्पाही मारल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आईच्या पायाल स्पर्श करत आशीर्वाद घेतले होते. त्यावेळी मोदी आणि त्यांच्या आईसोबतच्या भेटीचे फोटो समोर आले होते. ज्यामध्ये ते हिराबेन यांचे आशीर्वाद घेताना दिसले. मोदींनी जवळपास 46 मिनिटे आईसोबत गप्पा मारल्या होत्या. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे जुने चित्र त्यांच्या निवासस्थानातील भिंतीवर देखील आहे.
Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अनंतात विलीन
Heeraben Modi Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन अनंतात विलीन झाल्या आहेत. गांधीनगरमधील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी हिराबेन यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदींच्या आई हिरा बा यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दु:खद : राहुल गांधी
PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदी आणि हिराबेन यांच्यातील प्रेम, श्रद्धा आणि जिव्हाळा जगाला दिसायचा : एकनाथ शिंदे
PM Modi Mother Death : पंतप्रधान मोदी जेव्हा जेव्हा त्यांच्या आईला भेटायचे तेव्हा तेव्हा त्या दोघांमधील प्रेम, श्रद्धा, जिव्हाळा जगाला दिसायचा. ते खऱ्या अर्थाने आदर्श माता आणि आदर्श पुत्र आहेत, अशा भावना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांच्या आईच्या निधनावर राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
PM Modi Mother Death : नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात, मोदी आणि त्यांच्या भावाने त्यांना खांदा दिला
PM Modi Mother Death : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात झाली आहे. पीएम मोदी आणि त्यांच्या भावाने त्यांना खांदा दिला.