Rahul Gandhi: उत्तर प्रदेशात मनुस्मृती लागू, जातीय जनगणना करून दाखवून देऊ कोणाचा किती अंगठा कापला; राहुल गांधींचा जोरदार प्रहार
Parliament Winter Session: राहुल गांधी यांनी लोकसभेत आज अनेक घटनांवर भाष्य केलं आहे. संसदेमध्ये बोलताना त्यांनी देशात घडलेल्या घटना, संविधान,मनुस्मृति यावर भाष्य केलं आहे.
Parliament Winter Session: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (शनिवारी) सभागृहात संविधानावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी राहुल गांधींनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हाथरस बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशचे योगी सरकारही राहुल गांधी यांच्या निशाण्यावर होते. राहुल गांधी संसदेत बोलताना म्हणाले, चार वर्षांपूर्वी हाथरसमध्ये एका दलित मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित कुटुंब त्रास भोगत असताना गुन्हेगार मात्र बाहेर फिरत आहेत, असे घटनेत कुठे लिहिले आहे? मनुस्मृती यूपीमध्ये लागू आहे, संविधान नाही, असा हल्लाबोल राहुल गांधींनी (Rahul Gandhi) यावेळी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राहुल गांधी?
राहुल गांधी (Rahul Gandhi) पुढे म्हणाले, संविधानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींजी आणि नेहरूंचे विचार आहेत. त्या विचारांचे स्त्रोत शिव, बुद्ध, महावीर, कबीर आदी आहेत. संविधानाबाबत सावरकर म्हणाले होते की, संविधानाची सर्वात वाईट गोष्ट म्हणजे त्यात भारतीय असं काहीच नाही. त्याऐवजी मनुस्मृती लागू केली पाहिजे. जेव्हा संविधान वाचवण्याबाबत बोलतो तेव्हा तुमचे नेते सावरकरांबाबत चेष्टा करायला लागतात, असं म्हणत राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, जसा द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगठा कापला, त्याचप्रमाणे तुम्ही भारतातील तरुणांचा अंगठा कापत आहात. जेव्हा तुम्ही धारावी अदानीला विकता तेव्हा तुम्ही धारावीच्या लोकांचा अंगठा कापता. जेव्हा तुम्ही अदानीला मदत करता तेव्हा तुम्ही देशातील जनतेचा अंगठा कापता. देशात जात जनगणनेतून तुम्ही कोणा-कोणाचा अंगठा कापला हे आम्हाला पाहायचं आहे, लॅटरल एन्ट्रीच्या माध्यमातून तुम्ही मागासलेल्या दलितांचा अंगठा कापत आहात. तुम्ही अग्निवीर आणि पेपर फोडून तरुणांचा अंगठा कापत आहात, असे राहुल गांधी म्हणाले. आरक्षण मर्यादेची 50 टक्के मर्यादा आम्हाला पार करायची असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले, "हाथ्रसमध्ये चार वर्षांपूर्वी एका दलित मुलीवर बलात्कार झाला होता. पीडित कुटुंबे तुरुंगावासासारखं जीवन जगत असताना गुन्हेगार बाहेर फिरत आहेत. देशाच्या राज्यघटनेत हे कुठे लिहिले आहे? यूपीमध्ये मनुस्मृती लागू आहे, संविधान नाही., दुसऱ्या ठिकाणी घर देण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.आम्ही त्या कुटुंबाला इंडिया आघाडीचे लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करून देऊ. संभळमध्ये निष्पाप लोक मारले गेले. हे लोक एका धर्माविरुद्ध दुसऱ्या धर्माशी लढतात. आपण कोणाचा अंगठा कापला हे आपण जातीच्या जनगणनेद्वारे देशाला दाखवू इच्छितो, असे राहुल गांधींनी ठणकावले! 50% आरक्षण मर्यादेची सीमा आम्ही पार करणार असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.