पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली, राज्यात हे सगळीकडे घडतंय, बीड प्रकरणावरुन पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया
Pankaja Munde, छत्रपती संभाजीनगर : पुण्यात तरुणीला मारल्याची वाईट घटना घडली, राज्यात हे सगळीकडे घडतंय, असं मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलंय.
Pankaja Munde, छत्रपती संभाजीनगर : "मोक्का लावला मला महिती नाही, काय प्रतिक्रिया मी यावर देऊ? मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय तर योग्यच आहे.. तापसाबाबत आपण बोलणे योग्य नाही. पुण्यात काल वाईट घटना घडली, तरुणीला मारले हे सगळीकडे घडतंय, अशा घटना राज्यात सगळीकडे घडत आहेत...कुठलीही घटना होते भांडण, अथवा खून ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यासाठी ही संधी आहे", असं मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या छत्रपती संभाजीनगर येथे एबीपी माझाशी बोलत होत्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी माझ्या विभागाची बैठक घेतेय, माझ्या खात्याला बळ देण्यासाठी काम करतेय, मी उगीच आपलं अधिकाऱ्यांना झापले वगैरे नाही, मी समजून घेतलं...माझ्या मागे गर्दी अशीच आहे कमी जास्त अशी काही झालं नाही...प्रदूषण हा विषय राज्यापुरता नाही जागतिक विषय आहे... देश आणि परदेश सगळीकडून मार्गदर्शन घेतोय.. प्रदूषण बाबत आढावा घेतला दोषींवर कारवाई करण्यात येईल.. मग महापालिका असो वा अजून कुणी... नदी पुनर्जीवन करणे आमचं मुख्य काम असेल.
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यावर मी कॉऊंटर करणार नाही. त्यांचं जर म्हणताय शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाही. ते जर असं म्हणत आहेत.. त्यावर मी रोज काय बोलू? धस यांच्यावर मी काय बोलू, मी कुठं गप्प आहे, मी एसआयटीची मागणी केली होती, मी पहिली मागणी केली..माझ्या बोलण्यामुळे राज्य हलले असते तर आता जे ते बोलताय ते पूर्वी का बोलले नाही.. मागच्या 2 वर्षात का बोलले नाही..त्यांच्या मुळे तर बीड बदनाम झालं आहे. राजकीय भूमिका न घेता विषय संवेदनशील रितीने समजून घेतलं असते तर बीड अस बदनाम झालं नसते. आमच्या जिल्ह्यात लोक स्वाभिमानी आहेत...मी महिला राजकारणी म्हणून तिथं काम करते, सगळ्यात कष्टाचे जीवन असणारे लोक आमच्या जिल्ह्यातील आहेत. आम्ही काम करतो नाहीतर दरोडे करायला गेलो असतो ना.. अशा घटनेने जिल्हा बदनाम होत असेल तर आरटीआय मधून माझ्याकडे सर्व जिल्ह्यांची माहिती आहे.. नागपूरची घटना काय , पुण्याची काय अस सगळीकडे घडतंय, आणि मी पर्यावरण मंत्री आहे ,यावर काय बोलू , मुख्यमंत्री भूमिका मांडत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Suresh Dhas : सुरेश धसांनी बीडला बदनाम केलं; पंकजा मुंडेंच्या टीकेवर धस अण्णांचा पलटवार, सगळंच काढलं