एक्स्प्लोर

पालघर लोकसभा निवडणूक पंचरंगी होणार, हितेंद्र ठाकूर यांनी विरोधकांचा अंदाज चुकवला, बविआ उमेदवाराचा अर्ज दाखल

Palghar Lok Sabha Seat : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीच्या राजेश पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पालघरची निवडणूक पंचरंगी होण्याची चिन्हं आहेतं.

पालघर: पालघर लोकसभा निवडणुकीसाठी (Palghar Lok Sabha Seat) बहुजन विकास आघाडी (Bahujan Vikas Aghadi) कडून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. राजेश पाटील हे मागील पाच वर्ष बहुजन विकास आघाडीचे बोईसर विधानसभेचे आमदार असून ते गेली पंधरा वर्षे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ही आहेत .

महाविकास आघाडी, बहुजन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी त्याचप्रमाणे ,जिजाऊ विकास आघाडी या पक्षांचे उमेदवार निश्चित झाले असले तरीही महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अजूनही सुटलेला नाही.  पालघरची जागा नेमकी शिवसेनेकडे राहते की भाजपकडे जाते आणि उमेदवार कोण निश्चित होतो हे अजूनही गुलदस्त्यात आहे. 

एकीकडे ज्या पक्षांचे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली असून महायुतीचा उमेदवार निश्चित नसला तरीही त्यांचाही प्रचार सुरू झाला आहे. मात्र, आता पालघर लोकसभेसाठी महाविकास आघाडी, महायुती, बहुजन विकास आघाडी आणि जिजाऊ विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालघर लोकसभा क्षेत्रासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी बहुजन विकास आघाडी कडून बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी आज सर्वप्रथम उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधकांकडून बहुजन विकास आघाडी निवडणूक लढवणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. त्याला बविआकडून राजेश पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करुन उत्तर देण्यात आलं आहे.
  
अर्ज भरताना राजेश पाटील यांच्या बरोबर  अजिव पाटील, मनीष निमकर  प्रभाकर पाटील,विष्णू कडव, उमेश नाईक नितीन भोईर पंकज ठाकूर अजय खोकानी मुकेश सावे जितेंद्र शाहा,राजेंद्र पाटील  प्रवीण वनमाळी, हार्दिक राऊत, पी.टी. पाटील,  नागेश पाटील, संदीप पाटील, भावना विचारे उपस्थित होते.

हितेंद्र ठाकूर यांनी विरोधकांचा अंदाज चुकवला

बहुजन विकास आघाडी पक्षाकडून निवडणूक लढवली जाणार की महायुतीला पाठिंबा देणार असा तर्कवितर्क लढविण्यात येत होते. त्या तर्कवितर्कास बहुजन विकास आघाडीचे  सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी आमदार राजेश पाटील यांचा उमेदवारी आर्ज दाखल करून सर्व शंकांना व अफवाना पूर्णविराम दिला.

राजेश पाटील यांची सर्व प्रथम भाताने आदिवासी विद्यार्थी वसतिगृह प्रतिष्ठान ट्रस्ट, वसई याच्या सचिवपदी 1990 मध्ये निवड झाली.  ठाणे जिल्हा परिषदेवर 1997 ते 2002 पर्यंत सदस्य,  वसई पंचायत समितीच्या सभापतीपदी 2002 ते 2005 या काळात खुल्या प्रवर्गातून कार्यरत होते. 
 
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी राजेश पाटील यांची सलग तीनवेळा निवड झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक बोईसर विधानसभेचे 2019 पासून आमदार आहेत. महाराष्ट्र राज्याच्या जंगल कामगार  सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच विविध संघटना सामाजिक संस्थांवर ते कार्यरत आहेत. 

संबंधित बातम्या

Yavatmal News: आधी बोटाला शाई, मग पैशाचं वाटप,बोगस मतदानावरुन यवतमाळमध्ये राडा; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

 Lok Sabha Election 2024 Phase 2 : मतदार यादीतील घोळ दुसऱ्या टप्प्यातही कायम; शेकडो मतदार आल्या पावली माघारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget