Sudhakar Badgujar Nashik: बावनकुळेंनी भाजप पक्षप्रवेशाबाबत हात झटकले, बडगुजर म्हणाले, 'मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल!'
Sudhakar Badgujar Nashik: बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरती सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही.

नाशिक : नाशिकच्या राजकारणात आज मोठी राजकीय खळबळ उडाली असून शिवसेना (ठाकरे गट)चे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या सोबत बबन घोलप, काँग्रेसमधील अनेक माजी पदाधिकारी व नगरसेवक यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. या राजकीय घडामोडीमुळे ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान नाशिकमधून सुधाकर बडगुजर आणि शेकडो समर्थक पक्षप्रवेशासाठी मुंबईला निघाले आहेत. आज राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान बडगुजर यांच्या पक्षप्रवेशावरती सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचा एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. याबाबत बडगुजर यांनी बोलण्यास नकार दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही. स्थानिक नेतृत्व, स्थानिक आमदार आणि खासदार यांचा एकमत झाल्याशिवाय आमच्याकडे पक्षप्रवेश होत नाही. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मला कुठलीही माहिती नाही. नाशिकचे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा या पक्षप्रवेशाला विरोध आहे निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात लढतो आणि आता निवडणुकीला फक्त सहा महिने झाले आहे. त्यामुळे विरोधाची भावना असते आणि त्यामुळे नाशिकमध्ये त्यांना विरोधाची भावना आहे. तर यासंबंधीच्या प्रश्नावर बोलताना बडगुजर म्हणाले, बावनकुळे यांच्या बाबतीत त्यांनी बोलण्यास नकार दिला, पुढे ते बोलले मुंबईत गेल्यावर तुम्हाला समजेल, सर्व ठरले आहे त्याशिवाय जातोय का? असंही त्यांनी पुढे म्हटलंय.
लवकरच अधिक चित्र स्पष्ट होईल
सुधाकर बडगुजर यांना काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतरच त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगू लागली होती, मात्र, आज त्यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा रंगली आहे. आज मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजप कार्यालयात दुपारी 1 वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. या वेळी भाजप नेते गिरीश महाजन आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. बडगुजर यांच्या समवेत इतर स्थानिक नेतेही भाजपचा झेंडा हातात घेत नाशिक जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षप्रवेशाआधी बडगुजर यांच्या कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले. माध्यमांशी बोलताना बडगुजर म्हणाले, "आता ही सुरुवात आहे. सर्व सहकारी एकत्र येत आहेत. लवकरच अधिक चित्र स्पष्ट होईल."
काय बदलणार नाशिकच्या राजकारणात?
सुधाकर बडगुजर हे नाशिक शहरातील प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांपासून विधानसभेपर्यंत शिवसेनेला मजबूती मिळाली होती. आता त्यांनी भाजपचा हात पकडल्याने, नाशिक महानगरपालिकेसह आगामी विधानसभा निवडणुकांवरही याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. बडगुजर यांचा भाजपप्रवेश ही ठाकरे गटासाठी केवळ राजकीय नाही, तर जनाधार गमावण्याचीही मोठी धोक्याची घंटा आहे. काँग्रेसमधून आलेले नेतेही भाजपमध्ये गेले असल्याने विरोधी पक्षांमध्ये अस्वस्थता आणि अंतर्गत नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे.























