एक्स्प्लोर

Nilesh Rane: भास्कर जाधव तू आमच्या शेपटावर पाय दिलायस, जन्मभर लक्षात ठेवेन, तुला सोडणार नाही: निलेश राणे

Nilesh Rane Speech: चिपळूणच्या राड्यानंतर निलेश राणे संतापले, भास्कर जाधवांना वाहिली शिव्यांची लाखोली. आमच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेऊ. पण राणे साहेबांविषयी वाकडंतिकडं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही

गुहागर: भास्कर जाधव यांनी आमच्या शेपटावर पाय ठेवला आहे. मी या जन्मात ही गोष्ट विसरणार नाही. मी आता तुला सोडणार नाही, अशा आक्रमक शब्दांत निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले. ते शुक्रवारी गुहागर येथील जाहीर सभेत बोलत होते. या सभेपूर्वी चिपळूणमधून येताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या कार्यालयासमोर ठाकरे गट आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांचा राडा झाला. यावेळी झालेल्या दगडफेकीत काही दगड निलेश राणे यांच्या गाडीवर पडले. त्यामुळे आक्रमक झालेल्या निलेश राणे यांनी आपल्या भाषणात भास्कर जाधव यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली. 

भास्कर जाधव यांनी यापुढे सभा घ्याव्यात. ते सभा घेतील, तिकडे मीदेखील सभा घेईन. पण तू राहिलास तर पुढची सभा होईल, असा गर्भित इशारा यावेळी निलेश राणे यांनी दिला. भास्कर जाधव विनाकारण सगळ्या सभांमध्ये नारायण राणे यांच्यावर टीका करतात. आमच्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेऊ. पण राणे साहेबांविषयी वाकडंतिकडं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही, असे निलेश राणे यांनी म्हटले.

राणे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला अन् त्यासाठी घर गहाण ठेवलं: निलेश राणे

निलेश राणे यांनी आपल्या भाषणात बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील एक किस्सा सांगितला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी राणे साहेबांना बोलावून घेतलं. ते  म्हणाले की, 'नारायण आपल्याला काँग्रेसचे सरकार पाडलं पाहिजे'. तेव्हा राणे साहेबांनी बाळासाहेबांना शब्द दिला, यावेळी आपण सरकार पाडण्याचा प्रयत्न करु. तेव्हा राणे साहेबांकडे पैसे नव्हते, केवळ कार्यकर्त्यांची फौज होती. त्यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना गोरेगावाच्या मातोश्रीच्या क्लबमध्ये नेले. त्यावेळी पैसे नव्हते म्हणून राणे साहेबांनी घर गहाण ठेवले. पण त्यांनी कधीही बाळासाहेबांकडे पैसे मागितले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा उभा राहणारा एकमेव नेता म्हणजे नारायण राणे आहेत, असे निलेश राणे यांनी म्हटले.

बाळासाहेब ठाकरे गेले तेव्हा राणे साहेब जेवले नाहीत: निलेश राणे

बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा आम्ही सगळे लंडनला होतो. बाळासाहेब गेल्याची बातमी समजल्यानंतर नारायण राणे दिवसभर जेवले नाहीत. त्यावेळी आमचं सगळं घर रडलं होतं, अशी आठवण निलेश राणे यांनी सांगितली. भास्कर जाधव १९९५ आणि १९९९ दोनवेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आला. २००४ साली त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा ते मातोश्रीबाहेर रडत होते. त्यानंतर त्यांनी चिपळूणला येऊन अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्या संपूर्ण निवडणुकीत भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंना शिव्या घातल्या होत्या, असे निलेश राणे यांनी सांगितले.

आणखी वाचा

राणे पिता-पुत्रांनी उच्छाद मांडलाय, प्रत्येक तालुक्यात त्यांच्यासोबत अशाच घटना घडू शकतात; चिपळूणमधील राड्यावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
तिन्ही पक्षांचे मतभेद दूर झालेत, भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री होतील, तटकरेंचांही दुजोरा, आमदार महेंद्र थोरवेंचा दावा 
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget