एक्स्प्लोर

मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, राजकारण कधीही पलटू शकते; निलेश लंकेंचे सूचक वक्तव्य

Nilesh Lanke, अहमदनगर : "अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात.

Nilesh Lanke, अहमदनगर : "अजून काहीच ठरलेले नाही. राजकारण हे क्षणाला बदलत असते. राजकारणात पुढील काळातील गोष्टींबाबत आत्ता चर्चा करणे, योग्य नाही. त्याला काही अर्थही नसतो. तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात. राजकारणात पुढे काय होणार आहे? हे कोणालाच माहिती नसते. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही.", असं पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले. निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात प्रवेश करणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. दरम्यान, आज नगर येथे पत्रकार परिषद घेत त्यांनी यावर भाष्य केलं आहे. 

मला लोकसंपर्क वाढवण्याचा छंद आहे

निलेश लंके (Nilesh Lanke) म्हणाले, मी कार्यकर्त्या आहे, मला लोकसंपर्क वाढवण्याचा छंद आहे. मित्र परिवार जपण्याचा छंद आहे. याचा अर्थ असा नाही की, मला निवडणूक लढवायची आहे. मी जिल्ह्याच्या बाहेर देखील काही कार्यक्रमांना जात असतो. लोकसभा निवडणूक लढणार का ? या प्रश्नावर निलेश लंके यांनी राजकारण कधीही आणि केव्हाही पलटू शकतं. राजकारणात काही गोष्टी घडण्याअगोदरच त्याबाबत बोलण मला योग्य वाटत नाही. 

मी लोकसभा निवडणूक लढवावी, ही सहकाऱ्यांची इच्छा 

निलेश लंके (Nilesh Lanke) पुढे बोलताना म्हणाले, महायुती आणि जागावाटप हा वरिष्ठ स्तरावरचा प्रश्न आहे. मी शेवटचा घटक म्हणून काम करतो. शेवटच्या घटकाने उच्चस्तरीय विषयावर चर्चा न केलेली बरी आहे. काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते. लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे. माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे. मात्र, अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही, असंही लंके यांनी स्पष्ट केलं. 

लंकेंबाबत मला माहित नाही, शरद पवारांकडून चर्चेचं खंडन

गेल्या काही दिवसांपासून निलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु आहेत. खासदार अमोल कोल्हे यांनीही त्यांना प्रवेशासाठी साद घातली होती. शरद पवार गटाकडून नगर दक्षिणची निवडणूक निलेश लंके हे लढवतील, अशा चर्चाही सुरु होत्या. मात्र, शरद पवारांना या सर्व चर्चांवर पडदा टाकलाय. लंकेंबाबतच्या चर्चेचं शरद पवार यांनी खंडन केले आहे. शिवाय लंके येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे, असं रोहित पवार म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Nilesh Lanke : लंके साहेब, तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जातेय, दादांची साथ सोडू नका; निलेश लंकेचा निर्णय अजित पवार गटाच्या जिव्हारी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Worli Hit and Run Car CCTV | वरळी हिट अँड रन प्रकरणी सीसीटीव्ही समोर ABP MajhaNilesh Lanke Tractor Rally | खासदार निलेश लंकेंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर रॅली!  ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 07 July 2024Raju Waghmare : Worli Hit and Run प्रकरण दुर्दैवी, CM Eknath Shinde कुणाला पाठीशी घालणार नाहीत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Embed widget