एक्स्प्लोर

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची शांतीत क्रांती, 10 पैकी 10 जागांवर आघाडी

NCP Sharad Pawar Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे.

NCP Sharad Pawar Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील 48 जागांचे सुरुवातीचे कल समोर आले आहेत. त्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. शरद पवारांनी महाविकास आघाडीमध्ये 10 जागांवर निवडणूक लढवली होती, त्या दहाही जागांवर उमेदवार आघाडीवर आहेत. अजित पवारांनी फारकत घेतल्यानंतर शरद पवार यांनी नव्या जोमानं पक्ष बांधणी केली. दिवसरात्र प्रचार करत लोकसभेत मोठं यश मिळावलं आहे. 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये 10 जागांवरील सर्व उमेदवार आघाडीवर आहेत. दिंडोरीमध्ये राज्यमंत्री भारती पवार आणि भिवंडीमधील राज्यमंत्री कपिल पाटील यांना झटका बसलाय.सुरुवातीच्या कलामध्ये हे दोन्ही उमेदवार पिछाडीवर असून शरद पवार यांचे उमेदवार  

बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंची मोठी आघाडी - 

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे देशाचं लक्ष लागले होते. कारण, पवार घरण्यातील दोन उमेदवार मैदानात होते. शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या पक्षाकडून सुनेत्रा पवार मैदानात होत्या. सुरुवातीच्या कलामध्ये सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती. पण त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी जोरदार मुसंडी मारत मोठी आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर सुप्रिया सुळे यांनी तब्बल 19 हजार मतांची आघाडी घेतली आहे. 

शिरुरमध्ये तुतारी वाजली - 

पाचव्या फेरी अखेर शिरुरमधुन अमोल कोल्हे आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांनी 25088 मतांनी आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजी आढळराव पाटील पिछाडीवर आहेत.

बीडमध्ये पंकजा मुंडेंना झटका - 

बजरंग सोनवणे यांनी तब्बल 8 हजार मतांची आघाडी घेतली आहे. पाचव्या फेरीनंतर पंकजा मुंडे यांना मोठा धक्का मानला जातोय.

सातारा

सातऱ्यात शशिकांत शिंदेंनी मोठी आघाडी घेतली आहे. उदयनराजे भोसले यांना मोठा झटका बसला आहे. 

दिंडोरी - 

चौथी फेरीअखेर भास्कर भगरे 6989 मतांनी पुढे आहेत. मंत्री भारती पवार पिछाडीवर आहेत. 

माढा -

भाजपचे रणजीतसिंह निंबाळकर पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठी आघाडी घेतली आहे. 

रावेर  
 
रावेरमधून राष्ट्रवादी एस पी श्रीराम पाटील यांनी दहा वाजेपर्यंत आघाडी घेतली होती. रावेरमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. 

भिवंडी - 

भिवंडीमध्ये राज्यमंत्री कपिल पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे. बाळ्यामामा म्हात्रे यांनी मोठी आघाडी घेतली आहे

वर्धा

वर्ध्यामधून 11 वाजेपर्यंत अमर काळे आघाडीवर आहेत. 

अहमदनगर दक्षिण - 

भाजपचे सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. निलेश लंके यांनी 11 वाजेपर्यंतच्या कलामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. 
 
महाविकास आघाडीची मुसंडी - 

राज्यातील 48 जागांमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांना मोठी आघाडी मिळाली आहे. ठाकरेंचे 8, शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 10 उमेदवार आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीचे 28 उमेदवार आघाडीवर आहेत. तर महायुतीला 19 जागांवर आघाडी आहे. एक अपक्ष सध्या आघाडीवर आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  1 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर आम्हाही तीच भाषा करू - नवनीत राणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Laxman Hake: महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
महाराष्ट्राच्या मानगुटीवर जरांगे नावाचं भूत शरद पवारांनी बसवलं; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Eknath Shinde : त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
त्यावेळी आम्ही जे केलं ते खुलेआम केलं, जनतेच्या मनातील केलं, ते काय झोपले होते का? : एकनाथ शिंदे
Embed widget