मुख्यमंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरेंचा मला मंत्रीपद देण्याचा आग्रह होता पण...भुजबळांचा रोख अजित पवारांवर
Chhagan Bhujbal : प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी देखील मला मंत्रीपद देण्याचा आग्रह धरला होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं.
Chhagan Bhujbal : प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांनी देखील मला मंत्रीपद देण्याचा आग्रह धरला होता, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केलं. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मला मंत्रीपद मिळावं म्हणून आग्रह धरल्याचे भुजबळ म्हणाले. मात्र, हे सगळं कोणी केलं? का केलं? असे प्रश्न विचारले जात आहेत. पण दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही. पक्षाचा जो नेता असतोच, तोच निर्णय घेत असतो, असं म्हणत छगन भुजबळांनी सगळा रोख अजित पवार यांच्यावर धरल्याचे पाहायला मिळालं.
प्रश्न मंत्रीपदाचा नाही पण अवहेलना केल्याचं शल्य
प्रश्न मंत्रीपदाचा नाही पण अवहेलना केल्याचं शल्य असल्याचे भुजबळ म्हणाले. मी मुंबईला जाणार, ओबीसींचे नेत्यांना भेटणार चर्चा करणार, राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊस उचलणार असल्याचे भुजबळ म्हणाले. घाई करुन चालणार नाही विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे भुजबळ म्हणाले. अजित पवार म्हणाले आपण बसून चर्चा करु, अद्या कोणतीही चर्चा झाली नसल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मंत्रीमंडळात समावेश न केल्यानं मला सर्वांचे फोन आले. यामध्ये काँग्रेसचे फोन आले, शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांचे फोन आले, ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांचे फोन आले, त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील फोन आल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
मला राज्यसभेत पाठवायचं होतं तर मग विधानसभेला उभं राहायला का सांगितलं?
मी मुंबईला जाणार, ओबीसींचे नेत्यांना भेटणार चर्चा करणार, राज्यातील इतर नेत्यांशी चर्चा करुन पुढचं पाऊस उचलणारप, घाई करणार नाही. विचारपूर्वक निर्णय घेणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले. मला राज्यसभेत पाठवायचं होतं तर मग विधानसभेला उभं राहायला का सांगितलं? असा सवाल देखील भुजबळांनी यावेळी केला. जो न्याय नितीन पाटील यांना दिला तो न्याय मला का दिला नाही? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला. नितीन पाटील यांना खासदार केलं मग मला काही नाही ? असेही भुजबळ म्हणाले. आता राज्यसभेवर गेलो तर मतदारसंघातील लोक डोकी फोडतील असेही भुजबळ म्हणाले. मी माझ्या लोकांना आज सोडू शकत नाही. मी दबावाला बळी पडणार नाही. तुम्ही हिंमत ठेवा. असेही भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:























