एक्स्प्लोर

Ajit Pawar: अजित पवारांचा पुण्याचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर, चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईरांचा रामराम

Ajit Pawar NCP: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या पक्षाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. पुणे परिसर हा अजितदादांचा बालेकिल्ला होता. मात्र, आता हा गड ढासळू लागला आहे.

पुणे: भोसरी पाठोपाठ चिंचवड विधानसभेतही अजित पवारांना (Ajit Pawar) धक्क्यावर धक्के बसू लागलेत. आता चिंचवड विधानसभा लढण्याची तयारी केलेले ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईरांनी (Bhausaheb Bhoir) अजितदादांच्या पक्षाला रामराम ठोकायचं ठरवलं आहे. यासाठी त्यांनी आजच्या गांधी जयंतीचा मुहूर्त शोधलाय. भाऊसाहेबांनी बुधवारी सायंकाळी त्यांच्या समर्थकांचा मेळावा आयोजित केलाय. या मेळाव्यात ते त्यांची पुढची दिशा जाहीर करणार आहेत. 

चिंचवड विधानसभेत भाजपच्या अश्विनी जगताप विद्यमान आमदार असल्याने ही जागा भाजपला सुटणार हे उघड आहे. काहीही करुन आपल्याला महायुतीची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानं भाऊसाहेबांनी थेट घड्याळाचे काटे फिरवण्याचा निर्णय घेतलाय. पंचवीस वर्षे मी नगरसेवक राहिलोय, 2009च्या विधानसभेत माझा विश्वासघात झालाय. तीस वर्षे सातत्यानं माझ्यावर अन्याय होत आलाय, म्हणून आता मी जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळविण्याची तयारी केलीये. हे पाहता आजच्या मेळाव्यातून भाऊसाहेब भोईर तुतारी फुंकणार, मशाल पेटवणार की बंडखोरीचं हत्यार उपसणार? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

अजित पवारांच्या वर्चस्वाला सुरुंग

गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता सलग पंधरा वर्षे एकहाती सत्ता राखलेल्या अजित पवारांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होऊ लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.  2017च्या पालिका निवडणुकीत भाजपची सत्ता आली. तत्पूर्वी अजित पवारांनी राष्ट्रवादीची एकहाती सत्ता राखली. त्यामुळंच 'अजित पवार बोले, तैसे पिंपरी चिंचवड चाले' असं समीकरण बनलं. म्हणूनचं राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अपवाद वगळता सरसकट सर्वांनी अजित दादांना साथ दिली. मात्र आजवर भाजपशी दोन हात केलेल्या अजित दादांच्या शिलेदारांना आगामी विधानसभा अन पालिका निवडणुकीत स्वतःचं अस्तित्व राखायचं आहे. म्हणूनचं अजित दादांना धक्क्यावर धक्के देत त्यांचे समर्थक तुतारी फुंकत, पुन्हा शरद पवारांशी घरोबा करताना दिसत आहेत. 

अलीकडेच शहराध्यक्ष अजित गव्हाणेंनी दोन माजी महापौर आणि पंधरा माजी नगरसेवकांसह अजित दादांची साथ सोडत तुतारी फुंकली होती. तर दसऱ्याच्या दरम्यान माजी आमदार विलास लांडे, त्यांची पत्नी माजी महापौर मोहिनी लांडे आणि मुलगा विक्रांत लांडे ही तुतारी फुंकणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

चिंचवड विधानसभेत बसणारे धक्के

एकीकडे गेल्या वर्षीच्या पोटनिवडणुकीत पराभूत झालेले नाना काटे यंदा भाजपसोबत दोन हात करण्यास सज्ज आहेत, यासाठी शरद पवारांच्या पक्षात त्यांनी स्वतंत्रपणे फिल्डिंग लावलेली आहे. दुसरीकडे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष प्रशांत शितोळे, मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, विनोद नढे या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची उघडपणे भेट घेतली अन आम्ही एकूण पंधरा माजी नगरसेवक तुतारी फुंकण्यासाठी श्वास रोखून उभे आहोत, असा दावा केला.

तिसरीकडे ज्येष्ठ नेते माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर सुद्धा अजित दादांना आज रामराम ठोकणार आहेत. यासाठी संध्याकाळी होणाऱ्या समर्थकांच्या मेळाव्यात ते चिंचवड विधानसभा कोणत्या चिन्हावर की अपक्ष लढणार याची घोषणा करणार आहेत. आगामी विधानसभेच्या तोंडावर अजित दादांना एकामागोमाग एक बसणारे हे धक्के पाहता, त्यांचा बालेकिल्लाचं उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खाजगी वॉर्डात शिफ्ट करणारSSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदतBandra Robbery CCTV : सैफसारखा प्रकार या आधीही वांद्र्यात घडला? स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरणPravin Tarde Ahilyanagar : लोक कला जिवंत ठेवण्यासाठी मोठं पाऊल, प्रवीण तरडेंनी दिली माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
उज्ज्वल निकम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; आमदार सुरेश धस, देशमुख कुटुंबियांची मागणी मान्य होण्याची शक्यता
Latur Crime : सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
सख्ख्या भावांनी क्रूरपणे बापलेकांना संपवलं! जमिनीचा तुकडा ठरला जीवघेणा, नेमकं काय घडलं?
Infosys : गुड न्यूज, इन्फोसिस येत्या आर्थिक वर्षात 20 हजार फ्रेशर्सला नोकरी देणार, तिसऱ्या तिमाहीतील दमदार कामगिरीनंतर अपडेट समोर
तरुणांसाठी गुड न्यूज, इन्फोसिस येत्या वर्षभरात 20 हजार फ्रेशर्सना नोकरी देणार; तिसऱ्या तिमाहीत 6806 कोटींचा नफा
Dhananjay Munde : काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
काल वाल्मिक कराडच्या जाग्यावर बसून जनता दरबार, उद्या राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला धनंजय मुंडे येणार की नाही? छगन भुजबळांची सुद्धा अपडेट समोर
Israeli attacks on Gaza : युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
युद्धविरामची घोषणा करूनही इस्त्रायलचा गाझापट्टीत नरसंहार सुरुच; 21 लेकरं अन् 25 महिलांसह 87 पॅलेस्टिनींचा मृत्यू
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट, आता सीआयडीचेही तपास अधिकारी बदलले, नेमकं कारण काय?
Congress on Worship Act : प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
प्रार्थनास्थळ कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांविरोधात काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव
IPO Update : सलग सहा आयपीओंमधून दमदार कमाई, स्टॅलिऑन इंडियाच्या IPO साठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP कितीवर?
आयपीओमधून कमाईचा राजमार्ग, 6 IPO मधून चांगला परतावा, स्टॅलिऑन इंडियाचा रिटेल गुंतवणूकदारांचा कोटा पूर्ण
Embed widget