एक्स्प्लोर

Amol Mitkari: आधी IPS अंजना कृष्णांच्या चौकशीची मागणी, आता अमोल मिटकरींचा यू-टर्न; दिलगिरी व्यक्त करत म्हणाले...

Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याचबरोबर ही आपली भूमिका होती, पक्षाची नाही, मी पक्षाच्या भूमिकेशी सहमत आहे असंही मिटकरींनी म्हटलं आहे.

सोलापूर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्यावर फोनवरुन दमदाटी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला, त्यानंतर राज्यभरात हे प्रकरण चर्चेत आले आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) आणि अजित पवारांच्या व्हिडीओ कॉलची क्लीप व्हायरल झाल्यानंतर, महिला अधिकाऱ्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा, अशी मोठी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली होती, त्याबाबत त्यांनी पत्र देखील लिहलं होतं, त्यानंतर आता पुन्हा अमोल मिटकरी यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत दिलगिरी व्यक्त केली आहे, त्याचबरोबर ही आपली भूमिका होती, पक्षाची नाही, मी पक्षाच्या भूमिकेशी सहमत आहे असंही मिटकरींनी म्हटलं आहे. 

दिलगिरी व्यक्त करत घेतला यूटर्न

सोशल मिडीयावरची अमोल मिटकरींनी पोस्ट शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे, आणि म्हटलंय की,"सोलापुर घटनेसंदर्भात केलेला ट्वीट मी बिनशर्थ मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो.ही माझ्या पक्षाची भुमिका नव्हती तर माझी वैक्तिक भुमिका होती .आपले पोलिस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भुमिकेशी पूर्णपणे सहमत आहे", असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.

मिटकरी यांनी शुक्रवारी केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) पत्र लिहून कृष्णा यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याची मागणी केली. एका पत्रात त्यांनी कृष्णा यांची शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली. त्यांनी विनंती केली की हे निष्कर्ष संबंधित सरकारी विभागांना कळवावेत. अधिकृत नोंदींची योग्य छाननी करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. 

पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ 

राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे नाव माहीत नसलेल्या महिला अधिकाऱ्याची नियुक्ती संशयास्पद आहे. पूजा खेडकर प्रकरणाप्रमाणेच अंजना कृष्णा यांच्या निवड प्रक्रियेत घोळ झाला असल्याची आपल्याला शंका असल्याचं आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं होतं. अंजना कृष्णा यांच्या नेमणुकी संदर्भात राज्य सरकार आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे तक्रार करणार असल्याची आमदार अमोल मिटकरी यांनी माहिती दिली होती. त्यानंतर त्यांनी त्यासंदर्भात पत्र देखील लिहलं होतं.  

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो...मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या...यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून...माझा फोन आलाय...तहसीलदारांना सांगा असे पवार सांगताना दिसतात. 

कोण आहेत आयपीएस अंजना कृष्णा? (Who is IPS Anjana Krishna?)

1. आयपीएस अंजना कृष्णा मूळच्या केरळच्या त्रिवेंद्रममधल्या
2. 2023 मध्ये यूपीएससी 355 रँकने उत्तीर्ण, आयपीएस केडर
3. सुरुवातीला होम केडर, त्रिवेंद्रममध्ये एसीपीची जबाबदारी
4. मग महाराष्ट्रात सोलापूर ग्रामीण पोलिसात कार्यरत
5. प्रोबेशन कालावधीत पंढरपूरमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी
6. अतिशय कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख निर्माण 
7. करमाळ्यात अवैध व्यवसायाविरोधात कारवाईचा धडाका
8. दोन दिवसांपूर्वी अवैध मुरूम उपसा सुरू असताना माढा तालुक्यातील कुर्डू येथे कारवाई 
9. याच कारवाईसंदर्भात अजित पवारांशी बोलताना ठाम भूमिका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor Case: फलटणमधील डॉक्टर महिला प्रकरणी वडवणीत संताप, शहरात कडकडीत बंद
Sushma Andhare vs Nimbalkar : मी कुणाला भीक घालत नाही, सुषमा अंधारेंचा Nimbalkar यांना थेट इशारा
Cabinet Review : 'शिवसेनेच्या मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार', Eknath Shinde ॲक्शन मोडमध्ये
Phaltan Doctor Case : माझ्या मुलीनं जीवन संपवलं नाही, तिची हत्याच!; वडिलांचा गंभीर आरोप
Suresh Dhas : फलटण महिला डॉक्टर प्रकरणी राजकारण नको, SIT चौकशी करा; धस यांची मागणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
जाऊ दे रे गाडी... मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस; 21 मार्गावर धावणार लाल परी, 1.9 लाख प्रवाशांना सवारी
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
रिॲलिटी चेक - आदित्य ठाकरेंनी दाखवली 38 मतदारांची यादी, त्या खोलीत आता कुणीही राहात नाही
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 ऑक्टोबर 2025 | रविवार
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, एका महिलेचा जागीच मृत्यू, टायर फुटल्याने झाल अपघात 
IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका मोबाईल, टीव्हीवर कुठं पाहणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या अपडेटस 
भारत-ऑस्ट्रेलिया टी 20 मालिका मोबाईल, टीव्हीवर कुठं पाहणार? जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या अपडेटस 
Gold Silver Rate Update : गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
गुड न्यूज, 24 तासांत सोन्याच्या दरात मोठी घसरण; तर चांदी सहा हजारांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे नवे दर 
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
आदित्यने पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, मुख्यमंत्र्यांची ठाकरेंवर बोचरी टीका, रोहित पवारांनाही इशारा
Amazon Layoffs :  आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
आता अमेझॉनमध्ये लेऑफ्सचं वारं, 14000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, कारण समोर
Embed widget