एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case: फलटणमधील डॉक्टर महिला प्रकरणी वडवणीत संताप, शहरात कडकडीत बंद
फलटण (Phaltan) येथील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणानंतर बीड (Beed) जिल्ह्यातील वडवणी (Wadwani) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टर आणि मेडिकल असोसिएशनने या बंदमध्ये सहभाग घेतला असून रुग्णालय आणि मेडिकल सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. 'वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोटावर नाचवण्याचा प्रयत्न राजकीय मंडळींकडून केला जातो,' असा आरोप करत डॉक्टरांनी या हस्तक्षेपाचा निषेध केला आहे. या बंदला सर्व पक्ष, संघटना आणि व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, केवळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मृत डॉक्टर वडवणी तालुक्यातील असल्याने या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात उमटत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















