एक्स्प्लोर

मोठी बातमी : नाशिकमध्ये अजित पवार गटाला खिंडार, शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Ajit Pawar vs Sharad Pawar : नाशिकमध्ये अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील शेकडो कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

नाशिक : गेल्या दोन वर्षांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडत सिडकोतील ज्येष्ठ नेते तथा माजी नगरसेवक नाना महाले (Nana Mahale) यांनी अजित पवारांसोबत (Ajit Pawar) जाणे पसंत करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोट धरली. परंतु त्यानंतर तब्बल दोन वर्षांत अजित पवार गटात होणारी पक्षीय आणि राजकीय घुसमट सहन न झाल्याने नाना महाले आपल्या शेकडो समर्थकांसह अजित पवारांचे घड्याळ सोडून शरदचंद्र पवार गटात तुतारी वाजविण्यासाठी बारामती (Baramati) येथील गोविंदबागेत आज प्रवेश केला आहे. त्यामुळे नाशिकमध्ये (Nashik) अजित पवारांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर नवीन नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बळ मिळाले आहे.  

महाविकास आघाडीतून बाहेर पडत अजित पवार, भाजपा शिवसेना महायुतीत सहभागी झाले. यावेळी राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत आले. मात्र लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी विरोधकांना आपली ताकद दाखवून दिली आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून आता नाशिकचे कार्यकर्ते स्वगृही परतले आहेत.    

शरद पवारांचे नेतृत्व नाशिकमध्ये सिद्ध केले : नितीन भोसले

याबाबत शरद पवार गटाचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी म्हटले आहे की, नाशिकमधील अनेक पदाधिकार्‍यांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. नाना महाले, सिडको विभागाचे अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी प्रवेश केला आहे . दुसरा पक्ष तयार झाला आणि त्यांच्या मागे लोकं गेले होते. अजित पवार आणि भुजबळ यांची भाजपने ससेहोलपेट केली आहे. शरद पवारांचे नेतृत्व आम्ही नाशिकमध्ये सिद्ध केले आहे. भाजप वापरतो आणि सोडून देतो, हे लक्षात आल्याने हे लोकं शरद पवारांच्या पक्षात येत आहेत. विधानसभेला आम्ही आमचा आमदार करू, असे त्यांनी म्हटले आहे. 

नवीन नाशिकचे शेकडो पदाधिकारी शरद पवार गटात प्रवेश 

दरम्यान, माजी नगरसेवक नाना महाले, माजी नगरसेवक दत्ता पाटील, नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गिते, नवीन सिडको अध्यक्ष मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, नवीन नाशिक कार्याध्यक्ष सुनील आहिरे, नाशिक पश्चिम विधानसभा उपाध्यक्ष अक्षय परदेशी, राहुल कमनकर, ज्ञानेश्वर महाजन, सागर मोटकरी, अरुण निकम, राजेश भोसले, राजू पवार यांच्यासह नाशिक पश्चिम विधानसभा, सिडको, नवीन नाशिकच्या शेकडो प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. 

आणखी वाचा 

Bhaskar Bhagare on Majha Katta : दिंडोरीत कांदा प्रश्नाचा फायदा झाला का? खासदार भास्कर भगरेंनी सांगितलं विजयाचं गणित!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील लेबर कॅम्पमध्ये सापळ रचून मोहम्मद अलियानच्या मुसक्या आवळल्या
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Embed widget