Narendra Modi Road Show : मोदींच्या रोड शोचे निमंत्रण ईशान्य मुंबईतील घराघरात देणार; मुंबई भाजपने प्रचारासाठी कंबर कसली
Narendra Modi Mumbai Road Show : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 38 वॉर्ड असून त्यामधील घराघरात पंतप्रधान मोदींच्या रोड शोचे निमंत्रण पोहोचलं जाईल यासाठी भाजपने नियोजन केलं आहे.
मुंबई: राज्यातील शेवटच्या आणि पाचव्या टप्प्यासाठी मुंबईत मतदान होणार असून त्याच्या प्रचारासाठी भाजपने कंबर कसल्याचं दिसून येतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बुधवारी मुंबईच्या दौऱ्यावर असून भाजपच्या उमेदवारांसाठी ते ईशान्य मुंबईत रोड शो (Narendra Modi Mumbai Road Show) करणार आहेत. आता मोदींच्या मुंबईतील आगमनाचे निमंत्रण ईशान्य मुंबईतील घराघरात देण्याचं भाजपचं नियोजन आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या नेतृत्वाखालील पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली असून त्यामध्ये ईशान्य मुंबईच्या घराघरात मोदींच्या आगमनाचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो आहे.
ईशान्य मुंबईतील एकून 38 वॉर्ड असून या 38 वॉर्डमध्ये भाजपचे पदाधिकारी निमंत्रण देणार आहेत. बुधवारी सकाळी 7 ते 10 वाजेदरम्यान निमंत्रण देण्याची जबाबदारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे.
असा असेल मोदींचा रोड शो
सायंकाळी 6.30 वाजता मोदी यांचे विक्रोळी येथे आगमन होईल. रोड शो हा 6.45 मिनिटांनी सुरू होऊन तो 7.45 ला संपेल. घाटकोपर पश्चिम येथे एलबीएस मार्गावरील दामोदर पार्क जवळील अशोक सिल्क मिल येथून हा रोड शो सुरू होऊन तो एम जी रोड वरून श्रेयस टॉकीज, सर्वोदय सिग्नल, संघवी स्केवर करत तो घाटकोपर पूर्व मध्ये रामजी असर शाळेजवळील पार्श्वनाथ मंदिर चौक येथे समाप्त होईल.
आपण सगळ्यांनी आशीर्वाद देण्यासाठी जरूर यावे असं सांगत विकासपुरुष आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी येण्याचे आवाहन भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांनी केले आहे.
असा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो चा मार्ग
अशोक सिल्क मिल येथून रोड शो सुरु होईल.
पुढे रोड शो सर्वोदय जंक्शन ओलांडून मार्गक्रमण करेल.
एमजी रोड येथे डावे वळण घेऊन रोड शो घाटकोपर पश्चिमेकडून पूर्वेला जाईल.
घाटकोपर पूर्वेकडे वल्लभ बाग जंक्शन येथे पोहचेल.
याठिकाणी असलेल्या पार्श्वनाथ जैन मंदिराजवळ रोड शो चा समारोप होईल.
पुढील मार्गात तात्पुरता स्वरूपात बदल- (Temporarily change the route in mumbai)
-अंधेरी घाटकोपर मार्ग वरील घाटकोपर जंक्शन ते साकीनाका जंक्शन दरम्यान उत्तर व दक्षिण वाहिनीवरील वाहतूक
-गोळीबार मैदान व घाटकोपर मेट्रो असताना जंक्शन येणारी वाहतूक
-हिरानंदानी कैलास कॉम्प्लेक्स येथून गुलाटी पेट्रोल पंप जंक्शन कडे येणारी वाहतूक
ही बातमी वाचा: