एक्स्प्लोर

Narendra Modi : महाराष्ट्रात मोदींच्या सभांचा धडाका, 16 सभांमुळे अडचणीच्या वाटणाऱ्या ठिकाणी वातावरण पलटणार का?

Narendra Modi Maharashtra Lok Sabha Election : ज्या ज्या ठिकाणी भाजपला आपल्या जागा अडचणीत आल्याचं वाटतंय त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभांचे आयोजन करण्यात आलं आहे. 

मुंबई : राज्यातल्या लोकसभेच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय. मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलाय असं दिसतंय. त्याचं कारण म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत आहेत. मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या, तर उद्धव ठाकरेंनी कोकणापासून पश्चिम महाराष्ट्रांमध्ये धडाका लावलाय. शरद पवारांनीही बारामतीसह माढ्यात भेटीगाठींसह सभा सुरु केल्यात. तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनीनीही पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत केलंय. 

देशातील दुसऱ्या क्रमांकांचं सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे भाजपच्या 400 पार च्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचं. म्हणूनच की काय यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडाका लावलाय.  ज्या मतदारसंघात भाजपला आव्हान वाटतंय त्या मतदारसंघात भाजपनं पंतप्रधान मोदींच्या सभा आयोजित केल्याचं दिसतंय. त्यामुळे भाजपकडून राज्यात एका महिन्यात मोदींच्या 16 सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यापैकी काही ठिकाणी सभा झाल्या आहेत. 

पहिला टप्पा चंद्रपूरमधून 

मोदींच्या प्रचार सभांची सुरुवात झाली 8 एप्रिलला चंद्रपूरमधून. ही ती जागा जिथे सुधीर मुनगंटीवार नको नको म्हणत असताना, त्यांना मैदानात उतरवले गेले. ही ती जागा जिथे पहिल्या टप्प्यातील सर्वात कडवे आव्हान काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी उभे केले. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांच्या मदतीला धावले मोदी. 
 
दुसरी सभा दोनच दिवसांमध्ये, शिवसेनेच्या राजू पारवेंसाठी. मतदारसंघ रामटेक. राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार, अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आले. हा मतदारसंघ त्यांच्यासाठी नवा, कार्यकर्ते नवे, पक्ष नवे . त्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने नाराज. त्यामुळे परत एकदा मदतीला मोदी.

परभणी, नांदेडला मोदींच्या सभेची जास्त गरज

भाजपची सर्व्हेची यंत्रणा जबरदस्त मानली जाते. त्यातूनच कुठे जायचे, कोणाला आपली गरज आहे हे हेरला जात असावे यात शंका नाही. त्यातूनच दुसऱ्या टप्प्यात मोदींनी वर्धेत भाजपचे रामदास तडस, नांदेडमध्ये भाजपचेच प्रताप पाटील चिखलीकर तर परभणीत रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतल्या. तडस यांना सुनेच्या आरोपांचा फटका तर चिखलीकरांना मराठा आंदोलकांचा रोष तर जानकरांना बाहेरचा उमेदवार .  अशी आव्हाने निर्माण झाली होती. त्यामुळेच या टप्प्यात मोदी मॅजिकची त्यांना सगळ्यात जास्त गरज होती. त्यामुळे निशाण्यावरही आहेत ते मोदीच. 

पंकजा आणि सुजय विखेंसाठीही सभा घेणार

त्यानंतर मोदी चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी 6 मे रोजी बीडमध्ये पंकजा मुंडेंसाठी प्रचार घेणार आहेत. इथंही मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय. अगदी आंदोलकांनी पंकजा मुंडेंसमोर घोषणा दिल्या. 

त्यानंतर मोदी अहमदनगरमध्ये प्रचार सभा घेतील. जिथं शिवसेनेच्या शिर्डीतील उमेदवारसह नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी प्रचार करतील. नगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदवारीनं कडवं आव्हान उभं राहिलंय. त्यामुळे इथंही मोदींच्या गॅरंटीची गरज भासू शकते. शेवटच्या टप्प्यात मोदींनी कल्याण आणि दिंडोरीत सभा घेतील. जिथं ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे अशा जवळपास सहा उमेदावारांठी मोदी आपली गॅरंटी देतील.

या सोळा सभांचा विचार केला तर पंतप्रधान मोदी जवळपास तीस मतदारसंघ कव्हर करतील आणि स्वतःची गॅरंटी मतदारांना देतील. 

गेल्या वेळच्या तुलनेत यंदा सभांमध्ये वाढ

2019 सालच्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 51 दिवस प्रचार केला. देशभरात त्यांनी 142 प्रचार सभा घेतल्या तर 4 रोड शो केले होते. सर्वाधिक 50 सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात घेतल्या होत्या. महाराष्ट्रात शिवसेना-उद्धव ठाकरे सोबत होते तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला किल्ला लढवला होता. त्यामुळे मोदींना फक्त 9 प्रचार सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागल्या होत्या. 

यावेळी मात्र परिस्थिती बदलली आहे. यावेळी उद्धव ठाकरे भाजपसोबत नाहीत आणि शरद पवार कंबर कसून विरोधात उतरले आहेत. काँग्रेससोबत मिळून मोदीविरोधी वातावरण करण्यात मविआने कोणतीही कसर सोडली नाही. विरोधी पक्षांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध सर्व अशी केली आहे. त्यामुळे मोदीसुद्धा कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत. 

ही निवडणूक मोदींच्या नावावर लढवली जात असल्याने मोदींनी महाराष्ट्रात 16 ठिकाणी सभा घेतल्या आहेत. त्यापैकी सोमवारी 3 आणि मंगळवारी 3 अशा दोन दिवसात 6 सभा आहेत. महायुतीतील शिवसेनेसाठी मोदींनी 3-4 ठिकाणी, रासपसाठी एके ठिकाणी, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी एक-दोन ठिकाणी सभा घेतल्या आहेत. 

स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता तसंच ठाकरे-पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला न बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपचा प्रयत्न आहे. त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसत आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Narayan Rane on Vinod Tawde: विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
विनोद तावडेंबाबत नारायण राणेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले, 'त्यांना दिलेली वागणूक मला आवडली नाही'
Jharkhand Election 2024 : मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
मतदान करायला लागतंय! महाराष्ट्राच्या तुलनेत झारखंमध्ये मतदानाची टक्केवारी सुसाट, पहिल्या चार तासातच मतदारांचा जोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
मुंबईत मतदानाचा पॅटर्न बदलणार, मलबार हिल आणि भांडूपमध्ये सर्वाधिक मतदान, वरळी-माहीममध्ये काय स्थिती?
Exit poll: मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
मतदानानंतरचा एक्झिट पोल कधी अन् कुठं पाहाल? राज्यात महायुती की महाविकास आघाडी, कुणाला कौल
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या चार तासात करवीर अन् राधानगरीत मतदानाचा वेग वाढला; दक्षिण,उत्तर अन् कागलमध्ये काय घडतंय?
Embed widget