उद्धव ठाकरे गद्दार, पवारांनी मुख्यमंत्रीपदाचं चॉकलेट दिलं; नारायण राणेंचा मविआवर प्रहार
Narayan Rane News : उद्धव ठाकरे गद्दार आहेत, शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचं चॉकलेट दिलं, असं म्हणत नारायण राणे यांनी मविआवर जोरदार प्रहार केला आहे.
सिंधुदुर्ग : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गद्दार आहेत, 2019 ला मोदींचं नाव सांगून मत मागितली, असं म्हणत नारायण राणे (Narayan Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शरद पवारांसोबत (Sharad Pawar) गेल्यावर शिवसेनेची (Shivsena) काय अवस्था झालीय, शरद पवारांना शिवसेना संपवायची होती. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही, पण उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात, असं वक्तव्य करत नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला आहे.
'शरद पवारांना शिवसेना संपवायची होती'
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे गद्दार आहेत, 2019 ला मोदींचं नाव सांगून मत मागितली. मोदींच्या नावावर खासदार आणि आमदार निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांनी अनेक विनंत्या केल्या, मग संधी साधली शरद पवारांनी त्यांना शिवसेना संपवायची होती, त्यांनी मुख्यमंत्री पदाचं चॉकलेट उद्धव ठाकरे यांना दिलं. शिपाई होऊ शकत नाहीत,त्यांना मुख्यमंत्री करतो म्हटल्यावर बाळासाहेबांचं कर्तृत्व सोडलं आणि राष्ट्रवादी काँगेस बरोबर सरकार स्थापन केलं.
'उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात'
शरद पवारांसोबत गेल्यावर शिवसेनेची काय अवस्था झालीय. डोळ्यासमोरून 40 आमदार गेले, काही करू शकले नाहीत. बाळासाहेबांची असली शिवसेना होती, आता उद्धव ठाकरे यांचीच नकली शिवसेना आहे. बाळासाहेबांनी हिंदुत्वाशी प्रतारणा केली नाही. उद्धव ठाकरे सोनिया गांधींना मुजरा करतात, असं म्हणत नारायण राणेंनी जहरी टीका केली आहे. खरे बाळासाहेब, हिंदुत्व, अभिमान, त्याग करणारे होते, उद्धव ठाकरे नकली, विकले जाणारे असल्याचं वक्तव्य राणेंनी केलं आहे.
उद्धव ठाकरे सायकिक केस - नारायण राणे
पंतप्रधान मोदींना एका व्यासपीठावर बोलावत, काय काम केलं ते सांगतो म्हणणारे, उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले हे त्यांचं काम. मोदींनी केलेल्या कामांची यादी पत्रकारांना दया, उद्धव ठाकरे यांनी मोदींनी काय केलं असं विचारलं की तोंडावर मारा. उद्धव ठाकरे सायकिक केस, असल्याची खोचक टीकाही राणेंनी केली आहे.
Ratnagiri - Sindhudurga Lok Sabha : पाहा व्हिडीओ : रत्नागिरी सिंधुदुर्गात नारायण राणे महायुतीचे उमेदवार? शिवसेनेचाही दावा
महत्त्वाच्या इतर बातम्या :