Narayan Rane on Uddhav Thackeray : शरद पवारांमुळे चुकून मुख्यमंत्री झाला आणि बढाया मारतो, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
Narayan Rane on Uddhav Thackeray : आम्ही कारखाना, उद्योग परत सुरु केले. पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न कोरोना नंतर घेतलं. उद्धवने साडेपाच अक्षर लिहून दाखवावेत.
Narayan Rane on Uddhav Thackeray : "आम्ही कारखाना, उद्योग परत सुरु केले. पूर्वीपेक्षा जास्त उत्पन्न कोरोना नंतर घेतलं. उद्धवने साडेपाच अक्षरात लिहून दाखवावेत. साडेपाच लाखावर किती शून्य आहेत, त्यांने सांगावं. काहीच करत नाही, फक्त बोलतो. एक तो संजय राऊत काय बोलतो त्यालाच कळत नाही. याच याचे खासदार पाच, शरद पवारांचे तीन आणि वनवन फिरणाऱ्या राहुल गांधींचे पन्नास खासदार आणि हा पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहतो",अशी टीका भाजपचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे उमेदवार नारायण राणे (Narayan Rane) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्री शरद पवारांमुळे झाला आणि बढाया मारतो
नारायण राणे म्हणाले, संजय राऊत म्हणतो, आमच्या उद्धव ठाकरेंचे नाव पंतप्रधानपदासाठी इंडिया आघाडी घेत आहेत. पीएम लिहून दाखवा म्हणावं. अडिच वर्ष मुख्यमंत्री शरद पवारांमुळे झाला आणि बढाया मारतो. दोन दिवस मंत्रालयात होता. कायम घरात, मातोश्री सोडली नाही, कुलुपातला मुख्यमंत्री होता, असा मुख्यमंत्री असतो काय? तुम्हाला मोदींना मत द्यावे लागेल एवढे मला माहिती आहे. मोदींना मत म्हणजे नारायण राणेंना मत आहे. खाईल तर तुपाशी नाहीतर उपाशी. मी 100 टक्के काम केलंय. मला 100 टक्के मतं हवी आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राणेंना उमेदवारी
नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज देखील भरला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरु होती. अखेर नारायण राणे यांनी उमेदवारी खेचून आणली आहे. शिवाय उदय सामंत यांचे भाऊ यांचे किरण सामंत हे राणेंचे काम करणार असल्याचे खुद्द मंत्री उदय सामंत यांनीच स्पष्ट केलं आहे.
नारायण राणेंसाठी अमित शाहांची सभा
नारायण राणेंसाठी अमित शाह अॅक्शन मोडवर आले आहेत. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी नारायण राणेंसाठी 24 एप्रिलला अमित शहा यांची जाहीर होणार आहे. भाजपकडून सभेसाठी गोगटे कॉलेजमधील जवाहर मैदानाची जागा सभेसाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे नारायण राणेंचा आत्मविश्वास वाढलाय.
इतर महत्वाच्या बातम्या