Narayan Rane on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना चांगल्या भाषेत बोलता येत नाही, त्यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपणं देईल : नारायण राणे
Narayan Rane on Uddhav Thackeray, Mumbai : "लोकसभा निवडणुकांनंतर देशात मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आले. या सरकारने देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे."
Narayan Rane on Uddhav Thackeray, Mumbai : "लोकसभा निवडणुकांनंतर देशात मोदींच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आले. या सरकारने देशाचा अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प मागील अर्थसंकल्पापेक्षा तीन लाख कोटींनी जास्त आहे. यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल. या अर्थसंकल्पाचे सर्वांनी स्वागत केलं. मात्र आमच्या विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे. अर्थसंकल्प म्हणजे काय याचा अभ्यास विरोधकांनी करायला हवा. उद्धव ठाकरे यांनी जे मत व्यक्त केलं आहे, त्याला मी आज उत्तर देणार आहे. उद्धव ठाकरेंकडून दुसरी अपेक्षा करणे चुकीचं आहे. उद्धव ठाकरेंचा अभ्यास अर्थसंकल्पावर नाही हे त्यांनी स्वतःच एकदा सभेमध्ये सांगितलं होतं. त्यामुळे त्यांच्या प्रतिक्रियेला काही अर्थ नाही" असं भाजप खासदार नारायण राणे म्हणले. भाजप प्रदेश कार्यालय ,नरिमन पॉईंट मुंबई येथे नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी राणेंनी केंद्रीय अर्थसंकल्पांवर भाष्य करताना उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलता येत नाही, त्यांच्या काळातले बजेट माझ्याकडे आहे
नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरे यांना चांगल्या भाषेत बोलता येत नाही. त्यांच्या काळातले बजेट माझ्याकडे आहे. त्यांनी काय दिवे लावले ते समजेल. आता साडे चार लाख कोटींचं बजेट राज्याकडे आहे. यांना त्यावेळी कळलं का कितीची तूट आहे? हा आमचा सर्व समावेशक अर्थ संकल्प आहे. उद्धव ठाकरे यांना बजेट वाचायचं असेल तर मी टिपण देईन. प्रत्येक योजनेंतर्गत एक बजेट आहे. राज्याला योजना दिल्या जातात. सर्व योजना राज्यात आहेत आणि मोदी सरकारने दिल्यात. अज्ञानी राहुल गांधी बजेटवर बोलले. आम्ही बजेट मांडून लोकांना लाभ दिलाय. तुम्ही तर राजकोषीय तूट वाढवून दाखवली, असंही नारायण राणे यांनी नमूद केलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या मागे भाजप आहे, ते एकटे नाहीत
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, जे कंत्राटदार सोडून गेले त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि नवीन टेंडर काढावे आणि रस्ता लवकरात लवकर पूर्ण व्हावा. यासाठी मी पत्र व्यवहार देखील केला आहे, असंही नारायण राणे यांनी सांगितलं. शिवाय मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या स्वबळावर लढण्याच्या निर्णयाचे नारायण राणे यांनी स्वागत केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मागे भाजप आहे. ते एकटे नाहीत. जे कोणी त्यांच्यावर टीका करत आहेत त्यांचा बोलवता धनी दुसरा कोणी तरी आहे. जरांगे यांचे नाव मागच्या निवडणुकीत कुठेच नव्हते. जरांगे यांचे वैयक्तिक मत आहे, मराठा समाजाचे नाही. जरांगे यांचा मागे कोणीतरी दुसरं ताकद लावत आहे, असंही नारायण राणे यांनी नमूद केले.
Narayan Rane PC VIDEO : नारायण राणे यांची पत्रकार परिषद
इतर महत्वाच्या बातम्या