Narayan Rane on Nitesh Rane : नितेशने 'मशीद' हा शब्द वापरायला नको होता, नारायण राणेंकडून मुलाला समज
Narayan Rane : नितेश राणेंनी 'मशीद' हा शब्द वापरायला नको होता, असं म्हणत नारायण राणेंनी मुलाला समज दिली आहे.
Narayan Rane on Nitesh Rane, सिंधुदुर्ग : "नितेश राणेंनी जे काही व्यक्तव्य केलं. त्याला तसं म्हणायचं नव्हतं. आमच्या देशात येऊन जर तुम्ही अतिरेकी कारवाया करणार असाल तर आम्ही आक्रमक होऊ, असं त्याला म्हणायचं होतं. मात्र, मशीद हा शब्द त्याने वापरायला नको होता. त्यानंतर त्याने त्यामध्ये खुलासा केला, की माझी चूक झाली", असं रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे म्हणाले. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी रिफायनरी पुन्हा होण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.
View this post on Instagram
नितीन गडकरी हे मोठे नेते आणि माझे मित्र आहेत
नारायण राणे म्हणाले, नितीन गडकरी हे मोठे नेते आणि माझे मित्र आहेत. त्यांचं वक्तव्य राजकीय की वयक्तिक हे मला माहित नाही. मी त्या विषयावर बोलणार नाही. नितीन गडकरी यांच्या पंतप्रधान पदाच्या गौप्यस्फोटावर खासदार नारायण राणे यांनी बोलण्यास नकार दिला.
ब्रश न करता संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घेतो
पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, उध्दव ठाकरे यांना बजेट कळत नाही, ते मुख्यमंत्री काय होणार ? अडीच वर्षे मुख्यमंत्री राहून काहीही काम न करता फुकट मानधन घेतलं. ब्रश न करता संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद घेतो आणि पत्रकार दाखवतात अशा शब्दात नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर तोंडसुख घेतलं.
मशिदीत घुसून मारू हा नितेशचा शब्द चुकीचा होता
मशिदीत घुसून मारू हा नितेशचा शब्द चुकीचा होता, पण भारतात राहून देशाच्या विरोधी कृत्य करणाऱ्या लोकांच्या विरुद्ध देशातील किती मुस्लिमांनी आवाज उठवला. नितेश बोलला म्हणून त्याच्या विरुध्द आवाज उठवता, पण नितेशचे तोंड बंद केलात तर हजार नितेश राणे तयार होतील, असंही नारायण राणे म्हणाले.
संजय राऊत यांना अक्कल नाही. उध्दव ठाकरे आणि संजय राऊत म्हणजे महाराष्ट्र नाही. मी त्यांच्यावर बोलणार नाही. शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते. तेव्हा महिलांवरील अत्याचार का थांबले नाहीत. तेव्हाची यादी बाहेर काढू का ? असा सवालही नारायण राणे यांनी केला. या वयात हातात काही नसताना शरद पवार यांना काहीही आठवत, असंही राणे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
Lalbaugcha Raja : भाविकांना धक्काबुक्की, कार्यकर्त्यांनी मुजोरी दाखवल्यानंतर लालबागचा राजा मंडळाविरोधात पोलिसात तक्रार दाखल