एक्स्प्लोर

Sushma Andhare on Ladki Bahin:सुषमा अंधारेंचं राज्य सरकारला खुले चॅलेंज, लाडक्या बहिणीची काळजी असेल तर...

Sushma Andhare on Ladki Bahin Yojna: सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Nanded: राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सरकारने काढलेल्या लाडकी बहीण योजनेला विरोधी पक्षांकडून विरोध होत असताना शिवसेना उबाठाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare)सरकारला चॅलेंज केले  आहे. सरकारला लाडक्या बहिणीची इतकीच काळजी असेल तर दारूची दुकाने बंद करा असे आव्हान शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सरकारला दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे आयोजित एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

पंधराशे रुपयांची महिलांना गरज का पडते? , मालक धडधाकट कमवतो , पण येताना पावशेरी मारतो .. आकडे खेळतो.. त्याच्यातच चालली कमाई सगळी .. जर एवढी काळजी असेल शिंदे फडणवीस अजित पवार यांना , या  बहिणीच कल्याण व्हावं तर दारूचे धंदे बंद करावे असं सुषमा अंधारे म्हणाल्या . दारूचे धंदे बंद झाले तर माय मावल्या पंधराशे मागणार नाही, महीला सुखी होतील असं सुषमा अंधारे म्हणाल्या .

त्या माणसाने लाडकी बहीणवर बोलावे म्हणजे...

लाडकी बहीण योजना अजित पवारांनी जाहीर केली, ज्या माणसाने एक महिन्यापूर्वी आपल्याच बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला , त्या माणसाने लाडकी बहीण योजनेवर बोलावं याला काय अर्थ आहे? असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली . एवढी बहिणींची काळजी असेल तर बहिणीला पंधराशे नको  दाजीला नोकरी द्या, दाजीच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या असं सुषमा अंधारे म्हणाल्या. .

संजय राऊतांचा लाडकी बहीणवरून हल्लाबोल

सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojna)  विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार  संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी टीका केली आहे.  सध्याच्या महागाईच्या काळात  देखील महिला  सगळं घर  चालवतात. 1500 देऊन अपमान का करता  त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत  लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांनी निशाणा साधला  आहे.

लाडक्या बहिणींचा अपमान करु नका : संजय राऊत

सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे.  या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये मिळतात. महागाईच्या काळात  सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. महागाई, सिलेंडरचे वाढलेलले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

हेही वाचा:

सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या, लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange : मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Chandra Grahan 2024 : 18 सप्टेंबरला लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; सूतक काळ पाळावा लागणार? ज्योतिषी सांगतात...
18 सप्टेंबरला लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; सूतक काळ पाळावा लागणार?
The history of Kasmir : जन्माने बौद्ध असूनही काश्मीर पहिला शासक मुस्लिम का झाला? हिंदू धर्मात समावेश का झाला नाही?
जन्माने बौद्ध असूनही काश्मीर पहिला शासक मुस्लिम का झाला? हिंदू धर्मात समावेश का झाला नाही?
Amit Shah In Mumbai : अमित शाह लालबागच्या दर्शनाला मुंबईत येताच भाजप नेत्यांनी जागांचा आकडा सांगितला! सीएम शिंदे अन् अजितदादांच्या वाटणीला येणार तरी किती?
अमित शाह लालबागच्या दर्शनाला मुंबईत येताच भाजप नेत्यांनी जागांचा आकडा सांगितला! सीएम शिंदे अन् अजितदादांच्या वाटणीला येणार तरी किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 सप्टेंबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Barshi : मनोज जरांगे पाटील यांची बाजू घेतल्याने तरूणाला बेदम मारहाणABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM :9 September 2024: Maharashtra NewsSharad Pawar Lalbaugcha Raja : शरद पवार लालबागच्या राजा चरणी नतमस्तक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange : मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
मराठ्यांचा संयम सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात राहू देणार नाही; मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा
Chandra Grahan 2024 : 18 सप्टेंबरला लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; सूतक काळ पाळावा लागणार? ज्योतिषी सांगतात...
18 सप्टेंबरला लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; सूतक काळ पाळावा लागणार?
The history of Kasmir : जन्माने बौद्ध असूनही काश्मीर पहिला शासक मुस्लिम का झाला? हिंदू धर्मात समावेश का झाला नाही?
जन्माने बौद्ध असूनही काश्मीर पहिला शासक मुस्लिम का झाला? हिंदू धर्मात समावेश का झाला नाही?
Amit Shah In Mumbai : अमित शाह लालबागच्या दर्शनाला मुंबईत येताच भाजप नेत्यांनी जागांचा आकडा सांगितला! सीएम शिंदे अन् अजितदादांच्या वाटणीला येणार तरी किती?
अमित शाह लालबागच्या दर्शनाला मुंबईत येताच भाजप नेत्यांनी जागांचा आकडा सांगितला! सीएम शिंदे अन् अजितदादांच्या वाटणीला येणार तरी किती?
गुजरात एसीबीची धडक कारवाई, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला अटक, 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप
गुजरात एसीबीची धडक कारवाई, मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्याला अटक, 10 लाखांची लाच मागितल्याचा आरोप
Weekly Horoscope 09 To 15 September 2024 : पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
पुढचे 7 दिवस सर्व 12 राशींसाठी ठरणार खास; कसा असणार नवीन आठवडा? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Amit Shah: विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या बैठकीत रात्री उशीरापर्यंत राजकीय खलबतं,  अमित शाहांकडून 7 महत्त्वाचे सल्ले
विधानसभा निवडणुकीसाठी अमित शाहांनी महायुतीच्या नेत्यांना प्लॅन सांगितला, बैठकीत 7 महत्त्वाचे सल्ले
Shani Margi 2024 : दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ
दिवाळीनंतर शनि चालणार सरळ चाल; 'या' राशींचा सुवर्णकाळ होणार सुरू, नवीन नोकरीसह होणार अपार धनलाभ
Embed widget