एक्स्प्लोर

'..मग तोही दिवस स्वातंत्र्य दिवस मानायचा का?'अशोक चव्हाण यांचे नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले, 'नाना आत्मस्तुतीत मग्न राहणारे नेते..'

Ashok Chavan on Nana Patole: नाना पाटोले यांचा कधीच राजकारण होऊ शकलं नाही. काँग्रेसमध्ये असताना बंद खोलीमध्ये ते बोलत होते. आता चार चौघात बोलायची संधी ते त्यांनी सोडली नाही. यात काहीही नवीन नाही.

Ashok Chavan on Nana Patole: राज्यात विधानसभा निवडणुकांच्या (Vidhansabha eletion) तोंडावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे नांदेडला स्वातंत्र्य मिळाल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. यावरून अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना चांगलंच सुनावल आहे. नाना पटोले आत्मस्तुतीत मग्न असणाऱ्या नेते आहे असं म्हणत त्यांनी काँग्रेस- भाजप- काँग्रेस असा नाना पटोले यांचा राजकीय प्रवास उलगडून दाखवला.

माझा भाजप प्रवेश हे दुसरं स्वातंत्र्य असेल तर 25 जुलै 2009 रोजी नानांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तो दिवस साकोली मतदारसंघाचा स्वातंत्र्य दिवस मानायचा का असा सवाल भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी केला. 11 जानेवारी 2018 ला भाजप सोडून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. मी प्रदेशाध्यक्ष असल्याने ह्या गोष्टी जवळून पाहिल्या आहेत. हा दिवस साकोली मतदारसंघासाठी पारतंत्र्याचा झाला का? ते गेले आणि परत स्वगृही परत आले. असे चव्हाण म्हणाले.यावेळी काँग्रेस सोडल्याच्या दिवशीचा पेपर वाचून दाखवत अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

काँग्रेस सोडताना केलेल्या आरोपांवर आता तुमची भूमिका काय?

काँग्रेसने ओबीसी आणि शेतकऱ्यांची निराशा केल्याची टीका करत काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले होते. त्यांची हीच भूमिका आज कायम आहे का? असा सवाल अशोक चव्हाण यांनी केला. आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात तुमची याविषयी भूमिका काय याचा खुलासा करावा असं चव्हाण म्हणाले. ते काँग्रेसमध्ये केव्हा आले हे फार सोयीने विसरतात. 

नाना पटोले आत्मस्तूतीत मग्न

नाना पटोले आत्मस्तुतीत मग्न राहणारे नेते आहेत. जे काही पक्षात घडलं ते माझ्यामुळे झाला असं त्यांना वाटतं. लोकसभेत त्यांना जानपेक्षित यश मिळालं तो केवळ अपघात होता.  गैरसमज आणि अपप्रचार यातून नानांना लॉटरी लागली आहे. हे त्यांचे व्यक्तिगत यश असल्याचा गैरसमज आहे. नांदेड महानगरपालिकेत एकाहाती सत्ता आणला होता. एकेकाळी विधानसभेत नऊच्या नऊ जागा काँग्रेस-राष्ट्रवादीचा निवडून आणलेल्या आहेत. यांनी स्वतःच्या काळात किती जागा निवडून आणल्या? तुमच्या परफॉर्मन्सकडे तुम्हीच लक्ष द्यायला पाहिजे असेही ते म्हणाले.

काँग्रेसच्या गटबाजीमुळे चांगली माणंसं बाहेर फेकली गेली

नाना पाटोले यांचा कधीच राजकारण होऊ शकलं नाही. काँग्रेसमध्ये असताना बंद खोलीमध्ये ते बोलत होते. आता चार चौघात बोलायची संधी ते त्यांनी सोडली नाही. यात काहीही नवीन नाही. अशा पद्धतीने आपला सहकार्यांविषयी लूज टॉक करण्याचं काम ते करत आहेत. आता तर त्यांना उघडपणे संधीच मिळाली. काँग्रेस मधून जी चांगली माणसं बाहेर फेकली गेली ती काँग्रेस मधल्या गटबाजीमुळे फेकली गेली असं अशोक चव्हाण म्हणाले. यांना फक्त यांच्या जवळचेच लोक पाहिजेत. 

हेही वाचा:

24 फेब्रुवारीला नांदेडला स्वातंत्र्य मिळालं, नाना पटोलेंचा अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा, म्हणाले, नांदेडमध्ये आता 100 टक्के परफॉर्मन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
Wardha : दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
मोठी बातमी! अखेर  लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 PM:  10 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स ABP MajhaZero Hour : Iphone 16 सीरीज एआयसह लाँच, सिरी सेवाही एआयच्या मदतीने अधिक स्मार्टNagpur Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी महालक्ष्मीचं आगमनABP Majha Headlines : 8 PM:  10 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
लाडकी बहीण योजनेचं काकणभर का होईना जास्त योगदान एकनाथ शिंदेंचंच; महायुतीत पुन्हा श्रेयवादाची जंग
Wardha : दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
दूध विक्रेता की दारू विक्रेता? वर्ध्यात दुचाकीवर दुधाच्या कॅनमधून दारू विक्री 
मोठी बातमी! अखेर  लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
मोठी बातमी! अखेर लिपिक पदासाठीची 'ती' अट रद्द; BMC मधील 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
Photos: गणेशोत्सवाचा मुहूर्त साधला; महामंडळाच्या ताफ्यात नवी लाल परी; अफलातून सफारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Jayant Patil: अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
अजित पवार बारामतीतूनच लढतील, पण सत्ता मविआची येणार; पाटलांनी सांगितलं किती जागा जिंकणार?
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
'ओ अनिलबाबू....चार वर्षांपूर्वीची घटना नाही, ते तुमचे कर्म', अनिल देशमुखांवर भाजपचा हल्लाबोल
Amol Mitkari: महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
महायुतीत खटका... ''आजच्या घटनेमुळे शिंदे गट बदनाम झालाय''; अमोल मिटकरींचा शिवसेनेला इशारा
Embed widget