सोलापूर, बीड, धाराशिवमध्ये कोणाची बाजी, भाजपचे कुठे नगराध्यक्ष? शिंदेंनाही घवघवीत यश
सोलापूर (Solapur), धाराशिव आणि बीड नगरपालिकांचे निकाल आपण या बातमीत पाहणार आहोत.

मुंबई : राज्यातील नगरपालिका निवडणुकांचे (Election) निकाल हाती येत असून सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये, बहुतांश नगरपालिकेवर भाजपचे कमळ खुलले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (MVA) आणि बहुतांश ठिकाणी स्थानिक नेत्यांनी स्वतंत्रपणे पक्षाच्या निवडणुका लढवल्या आहेत. त्यानुसार, सोलापूर (Solapur), धाराशिव आणि बीड नगरपालिकांचे निकाल आपण या बातमीत पाहणार आहोत. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चांगलीच चुरस पाहायला मिळते.
सोलापूर निकाल
सोलापूर : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक नगराध्यक्ष पदाचा निकाल
1. अक्कलकोट .... भाजपा
2. मैंदर्गी...... भाजपा
3. बार्शी..... भाजप
4. अनगर..... भाजपा
5. दुधनी... शिवसेना शिंदे गट
6. सांगोला.. शिवसेना शिंदे गट
7. मोहोळ.. शिवसेना शिंदे गट
8. कुर्डूवाडी... शिवसेना ठाकरे गट
9. मंगळवेढा ....तीर्थक्षेत्र विकास आघाडी
10. अकलूज..... शरदचंद्र पवार राष्ट्रवादी
11. करमाळा.... स्थानिक विकास आघाडी
12. पंढरपूर.... तीर्थक्षेत्र विकास आघाडी
सोलापूर जिल्ह्यात भाजपची स्वबळावर लढण्याची रणनीती चुकली?
जिल्ह्यातील 12 पैकी केवळ 3 नगरपालिकावर भाजप विजयी, बार्शीत ही भाजपचा उमेदवार आघाडीवर
तर महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाची 3 जागावर विजयी
सोलापूर जिल्ह्यातील 12 पैकी 7 जागावर महायुतीची आघाडी तर 3 जागावर स्थानिक आघाडीचे उमेदवार विजयी
विरोधी पक्षातील ठाकरे गट आणि शरद पवार गट एक-एक नगरपरिषदेवर आघाडीवर
काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार, जिल्ह्यात काँग्रेसचा नगराध्यक्ष पदावर एक ही उमेदवार विजयी नाही
सोलापूर जिल्हा नगराध्यक्ष आघाडी कोणाची?
एकूण - 11 नगरपरिषद + 1 नगरपंचायत
भाजपा - 3 नगरपरिषद, 1 नगरपंचायत
(अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी, अनगर)
शिवसेना शिंदे - 3
(दूधनी, मोहोळ, सांगोला)
शिवसेना ठाकरे - 1
(कुर्डुवाडी)
शरद पवार गट - 1
(अकलूज)
स्थानिक आघाडी - 3
(करमाळा, पंढरपूर, मंगळवेढा)
अक्कलकोट तालुक्यातील दोन्ही दिग्गज नेत्यांनी आपले गड राखले आहेत. भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा अक्कलकोट नगरपरिषदेवर एकतर्फी विजय मिळाला. तब्बल 135 वर्षांची परंपरा मोडत मैंदर्गी नगरपरिषदेवर देखील भाजपाचा झेंडा फडकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी होम ग्राउंड दुधनी नगरपरिषदेवर एकतर्फी दणदणीत विजय मिळवला. माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे नगराध्यक्ष पदावर विजयी
मंगळवेढा नगरपालिका
भाजप आमदार समाधान आवताडे यांना मोठा धक्का
नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुनंदा बबनराव अवताडे या 200 मतानी विजयी झाल्या
भाजप 11 नगरसेवक
विरोधी तीर्थक्षेत्र विकासासाठी 9 नगरसेवक
अनगर नगरपरिषद अखेर बिनविरोध घोषित
भाजप नेते राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील अनगरच्या प्रथम नगराध्यक्ष बनल्या. भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठी चूरस पाहायला मिळाली. अखेर निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी प्रमाणपत्र दिले. विरोधकांनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला मात्र लोकांनी विश्वास दाखवल्याचं त्यांनी म्हटलं.
सांगोला नगरपरिषद - एकूण 20
दोन आधीच बिनविरोध आल्या होत्य़ा
शहाजी बापूंची एक हाती सत्ता
नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आनंदा माने हे 4775 मतांनी तिसऱ्या फेरी अखेर आघाडीवर
17 जागांवर शहाजी बापूंची एक हाती आघाडी
एका जागेवर आघाडी
करमाळा : माजी आमदार जयवंत जगताप यांच्या गटाला धक्का ; जयवंत जगतापांच्या पत्नी महानंदा उर्फ नंदिनीदेवी जगताप पराभूत
अकलूज नगरपालिका
खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी ताकद दाखविली ..
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रेश्मा आडगळे 2793 मतांनी विजयी
राष्ट्रवादी शरद पवार गट 22
नगरसेवक विजयी
भाजप 4 नगरसेवक विजयी
बीड जिल्हा निकाल
गंगाखेड नगर परिषदेत माझी बहीण निवडून आलीय, परळी नगरपालिकेत आमची महायुतीची सत्ता आलीय, त्यामुळे मला आनंद आहे. माझा भाचा देखील निवडणुकीत निवडून आलाय... महाराष्ट्रात एकतर्फी महायुतीचा विजय होतोय, मला पक्षानं दोन ठिकाणी प्रचारासाठी पाठवलेलं, त्या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झालाय...
धनंजय मुंडे
माजी मंत्री
परळीत मंत्री पंकजा मुंडे यांनी यशश्री निवासस्थानी नगरपरिषद मधील विजयी सदस्यांचे पुष्पहार घालून अभिनंदन केले आहे
या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे
या ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलाल देखील उजळला आहे.
धाराशिव निवडणूक निकाल
धाराशिव - पक्षनिहाय
भाजप - 4 ( 3 विजयी 1 जागेचा निकाल येणे बाकी)
शिवसेना शिंदे - 3
स्थानिक आघाडी - 1 ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
शिवसेना उबठा - 0
काँग्रेस - 0
राष्ट्रवादि काँग्रेस अजित पवार - 0
राष्ट्रवादि काँग्रेस शरद पवार - 0
तुळजापूर - विनोद पिटू गंगणे भाजप १७७० मतांनी विजय
कळंब - सुनंदा शिवाजी कापसे २२५४ मतांनी विजयी
धाराशिव - नेहा राहुल काकडे, भाजपा आघाडी निकाल येणे बाकी
नळदुर्ग - बसवराज धरणे भाजप 563 मतांनी विजयी
मुरूम - बापूराव पाटील भाजपा ४०१९ मतांनी विजयी
उमरगा - किरण गायकवाड शिवसेना ६२४२ मतांनी विजयी
भूम - संयोगिता संजय गाढवे, 198 आलम प्रभू शहर विकास आघाडी ( शिवसेना - तानाजी सावंत समर्थक )
परांडा - झाकीर सौदागर, शिवसेना 189 मतांनी विजयी
परंडा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे सेनेचे जाकीर सौदागर 189 मतांनी विजयी
कळंब नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या सुनंदा शिवाजी कापसे जवळपास 2200 मतांनी विजयी
नळदुर्ग - नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज आप्पा धरणे 563 मतांनी विजयी
तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार पिटू गंगणे 1770 मतांनी विजयी
उमरगा - शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड 6242 मतांनी विजयी.
























