एक्स्प्लोर

MVA seat sharing: मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, रावेर अन् जळगावचा तिढा सुटला, लवकरच घोषणेची शक्यता

Loksabha Election 2024: महाविकास आघाडीचं ठरलं! रावेरची जागा शरद पवार गटाला, जळगावची सीट ठाकरे गट लढवणार. मविआच्या नेत्यांकडून लवकरच सर्व जागांचे अंतिम जागावाटप पूर्ण होईल.

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. एकीकडे भाजपने महाविकास खिळखिळी करण्यासाठी नेत्यांची फोडाफोडी सुरु केली आहे. मात्र, अशा परिस्थितीमध्येही महाविकास आघाडीने लोकसभेच्या जागावाटपाची (Loksabha Election 2024) आपली चर्चा नेटाने सुरु ठेवली आहे. याच चर्चेमधून आता लोकसभेच्या दोन जागांवरुन निर्माण झालेला तिढा सुटला आहे. त्यानुसार रावेर लोकसभा (Raver Loksabha) मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून लढवली जाईल. या जागेवरुन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रावेरमध्ये एकनाथ खडसे आणि भाजपकडून त्यांची सून रक्षा खडसे, यांच्यात लढत रंगू शकते.  तर जळगाव लोकसभा मतदारसंघ हा ठाकरे गटाला मिळाला आहे. या दोन्ही जागा कोणी लढवायच्या, याबाबत महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांमध्ये एकमत झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम चर्चा पूर्ण होऊन कोणाला कोणत्या जागा मिळाल्या हे जाहीर करण्यात येईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गट कोणत्या जागा लढवणार, याबाबत असलेला सस्पेन्स लवकरच संपुष्टात येणार आहे. 

लोकसभेच्या आठ जागांवरुन तिढा

मविआच्या घटकपक्षांमध्ये फार पूर्वीच लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु झाली होती. एकूण ४८ जागांपैकी ४० जागांवर मविआच्या घटकपक्षांमध्ये अगोदरच एकमत झाले आहे. तर उर्वरित 8 जागांचा तिढा अद्याप कायम आहे. या जागांमध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यांचा समावेश आहे. याशिवाय, काँग्रेस पक्ष मुंबईतील दक्षिण मध्य आणि उत्तर पश्चिम या दोन मतदारसंघांसाठी आग्रही आहे. परंतु, या दोन्ही जागा २०१९ मध्ये शिवसेनेने जिंकल्या होत्या. त्यामुळे राज्यातील इतर दोन जागांच्या मोबदल्यात ठाकरे गट मुंबईतील या जागा सोडण्यास तयार होणार का, हे लवकरच स्पष्ट होईल.

वंचितला किती जागा मिळणार?

आगामी लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांचा वंचित बहुजन आघाडी हा पक्ष निर्णायक भूमिका बजावेल, अशी शक्यता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमुळे शिवसेना आणि काँग्रेसच्या अनेक बड्या उमेदवारांचा पराभव झाला होता. मात्र, यावेळी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाली आहे. मात्र, वंचितला नेमक्या किती जागा मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वंचितने लोकसभेच्या १२ जागांचा प्रस्ताव सुरुवातीच्या टप्प्यात मांडला होता. परंतु, महाविकास आघाडी वंचितला किती जागा सोडणार, हे पाहावे लागेल. प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटात समझोता झाल्याने 'वंचित'ला जागा ठाकरे गटाच्या गोटातून सोडल्या जातील, असा अंदाज आहे.

आणखी वाचा

जालना, शिर्डी ते मुंबई दक्षिण मध्य, लोकसभेच्या 8 जागांवरुन मविआमध्ये धुसफूस, 40 जागांवर सहमती!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
वर्ध्यात 2019 च्या तुलनेत मतदानात सात टक्क्यांनी वाढ, जनतेचा कौल महायुती की मविआला? चर्चांना उधाण
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
मोठी बातमी! चिपळूमध्ये स्ट्राँग रुमच्या परिसरात तीन संशयित, भर रात्री अजितदादांच्या हजारो कार्यकर्त्यांची गर्दी
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
Health: शाकाहारी की मांसाहारी? आरोग्यासाठी कोणता आहार उत्तम आहे? तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
राज ठाकरे मुख्यमंत्री होणार? सर्वेक्षण काय सांगतं, मतदारराजा कुणाच्या हाती सत्तेची चावी देणार?
Maharashtra Vidhan Sabha Exit Poll 2024: महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकालाची शक्यता, राज्यातील या 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
महाड, कागल आणि वर्सोव्यात धक्कादायक निकाल? राज्यातील 'या' 32 उमेदवारांचा विजय पक्का, प्रजातंत्रचा एक्झिट पोल
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget