मविआमध्ये 20-18-10 फॉर्म्युल्यावर एकमत झाल्याची चर्चा, दोन दिवसात निर्णय जाहीर करणार!
MVA Seat sharing formula : शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) 20 जागा लढवणार ठाम आहे. तर शरद पवार (Sharad Pawar NCP) यांची राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढवणार आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष 15 ते 18 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुंबई: महाविकास आघाडीचा लोकसभेचा (Lok Sabha Election 2024) जागा वाटपाचा फॉर्म्युला (MVA Seat sharing formula) दोन दिवसात ठरणार आहे. शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thackeray Group) 20 जागा लढवणार ठाम आहे. तर शरद पवार (Sharad Pawar NCP) यांची राष्ट्रवादी काँग्रेस 9 ते 10 जागा लढवणार आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष 15 ते 18 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. वंचित बहुजन आघाडीच्या जागा आणि तिढा असलेल्या 8 जागांवर अजूनही चर्चा सुरू आहे.
त्यामुळे आतापर्यंत 20-18-10 या फॉर्म्युल्यावर अंतिम चर्चा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाविकास आघाडीमध्ये अजूनही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट काही जागांसाठी आग्रही आहे. वंचित बहुजन आघाडीला यामध्ये आणखी किती जागा द्यायच्या? यावर चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी 2 जागा मविआ सोडण्याची शक्यता आहे.
वंचितचा 27 जागांवर दावा
दरम्यान, मविआच्या बैठकांचं सत्र सुरु असून, कालच्या बैठकीनंतर वंचित आघाडीने महाविकास आघाडीकडे (MVA) 27 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) एकूण 27 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. वंचित बहुजन आघाडी अकोला,जालना आणि पुणे या तीन लोकसभा मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi) दिलेल्या प्रस्तावामुळे महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढणार की सुटणार? असा प्रश्न सध्या निर्माण झालाय.
2019 च्या लोकसभेचं गणित काय होतं?
महाराष्ट्रात 48 जागांवर लोकसभेची निवडणूक होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होती. 2019 मध्ये 48 पैकी 23 जागा भाजपने जिंकल्या तर 18 जागांवर शिवसेनेने विजय मिळवला. चार जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने विजय मिळवला असून काँग्रेस आणि एमआयएमचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे.
MVA Seat Sharing : कोणत्या मतदारसंघाची जागा कोण लढवू शकतं?
१)रामटेक - चर्चेमध्ये ही जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती
२ )बुलढाणा - शिवसेना ठाकरे गट
३) यवतमाळ वाशीम -शिवसेना ठाकरे गट
४)हिंगोली - चर्चेमध्ये ही जागा काँग्रेस लढवणार असल्याची माहिती
५) परभणी -शिवसेना ठाकरे गट
६) जालना - चर्चमध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती
७) संभाजीनगर -शिवसेना ठाकरे गट
८) नाशिक -शिवसेना ठाकरे गट
९) पालघर -शिवसेना ठाकरे गट
१०) कल्याण - शिवसेना ठाकरे गट
११) ठाणे - शिवसेना ठाकरे गट
१२) मुंबई उत्तर पश्चिम - चर्चमध्ये शिवसेना ठाकरे गट ही जागा लढवणार असल्याची माहिती
१३) मुंबई दक्षिण -शिवसेना ठाकरे गट
१४) मुंबई ईशान्य -शिवसेना ठाकरे गट
१५) मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना ठाकरे गट या जागेसाठी आग्रही
१६) रायगड -शिवसेना ठाकरे गट
१७)रत्नागिरी सिंधुदुर्ग शिवसना ठाकरे गट
१८) मावळ -शिवसेना ठाकरे गट
१९) शिर्डी - चर्चेमध्ये शिवसेना ठाकरे गट ही जागा लढवणार असल्याची माहिती
२०) धाराशिव -शिवसेना ठाकरे गट
२१) कोल्हापूर - शिवसेना ठाकरे गट ( शिवसेना ठाकरे गटाकडे ही जागा जरी असली तरी ही जागा छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली जाऊ शकते )
२२) हातकणंगले -( स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी जागा सोडली मात्र अद्याप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मग यामध्ये येण्याची तयारी न दर्शवल्याने ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे आहे )
२३) अकोला - (वंचित बहुजन आघाडी साठी सोडणार )
२४) शिरूर - राष्ट्रवादी
२५) सातारा -राष्ट्रवादी
२६) माढा- राष्ट्रवादी
२७) बारामती -राष्ट्रवादी
२८) जळगाव -राष्ट्रवादी
२९) रावेर -राष्ट्रवादी
३०) दिंडोरी -राष्ट्रवादी
३१) बीड -राष्ट्रवादी
३२) अहमदनगर -राष्ट्रवादी
३३) अमरावती -काँग्रेस
३४) भंडारा - चर्चेदरम्यान काँग्रेस ही जागा लढवणार असल्याची माहिती
३५) चंद्रपूर -काँग्रेस
३६) गडचिरोली - काँग्रेस
३७) नांदेड -काँग्रेस
३८) लातूर -काँग्रेस
३९) धुळे -काँग्रेस
४०) नंदुरबार -काँग्रेस
४१) पुणे -काँग्रेस
४२) सोलापूर - काँग्रेस
४३)सांगली -काँग्रेस
४४) मुंबई उत्तर मध्य- काँग्रेस
४५) मुंबई उत्तर -काँग्रेस
४६) भिवंडी - काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे
४७) वर्धा- काँग्रेस
४८) नागपूर -काँग्रेस
शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेसाठी संभाव्य उमेदवार
शिवसेना ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार
- शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
- बुलडाणा - नरेंद्र खेडेकर
- ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील
- रायगड - अनंत गीते
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
-उत्तर पश्चिम - मुंबई - अमोल कीर्तीकर
-संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
- धाराशिव - ओमराजे निंबाळकर
- ठाणे - राजन विचारे
-परभणी - संजय जाधव
तिढा असलेल्या जागी विद्यमान खासदार कोण?
- रामटेक - कृपाल तुमाणे (शिवसेना शिंदे गट)
- हिंगोली - हेमंत पाटील (शिवसेना शिंदे गट)
- वर्धा - रामदास तडस (भाजप)
- भिवंडी - कपिल पाटील (भाजप)
- जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
- शिर्डी - सदाशिव लोखंडे (शिवसेना शिंदे गट)
- मुंबई दक्षिण मध्य - राहुल शिवाळे (शिवसेना शिंदे गट)
- मुंबई उत्तर पश्चिम - गजानन कीर्तिकर (शिवसेना शिंदे गट)
संबंधित बातम्या
MP list of Maharashtra : महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांची यादी, कोणत्या पक्षाचे किती खासदार?