एक्स्प्लोर

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत संजय राऊतांचा खळबळजनक दावा; दोन महिन्यांनी पैसे मिळणार नसल्याचं वक्तव्य

Maharashtra Politics: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना 1500 रुपये महिन्याला मिळणार. रक्षाबंधनाच्या दिवशी पहिला हप्ता मिळणार. योजनेसाठी राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे, संजय राऊतांची टीका

नवी दिल्ली: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे जनतेची फसवणूक आहे. आता विधानसभा निवडणूक आहे पण दोन महिन्यांनी लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. महायुती सरकार राज्यावर कर्जाचा डोंगर करेल आणि पळून जाईल. लाडक्या बहीण योजनेसाठी (CM Ladki Bahin Yojana) राज्य सरकारच्या तिजोरीतील पैसा वापरला जात आहे. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमदारांकडे ठेकेदार आणि जनतेकडून लुटलेले पैसे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते शुक्रवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर आगपाखड केली. दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. नव्या संसदेतही पाणी शिरले होते. या मुद्द्यावरुन संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. नवी संसद आणि अयोध्येतील राम मंदिराच्या कामाला एक वर्षच पूर्ण झाले आहे. तरीही याठिकाणी पावसाळ्यात पाणी गळत आहे. त्यामुळे या दोन्ही कामांसाठी भाजप सरकारने ठेकेदरांना किती पैसे दिले, या सगळ्यातून कमिशन कोणाला मिळालं? याची चौकशी झाली पाहिजे. राम मंदिराचं काम लार्सन अँड टुब्रो आणि दिल्लीतील नव्या संसदेचं काम टाटांनी केले. पण या कामाची इतर कंत्राटं कोणाला देण्यात आली होती, याची चौकशी झाली पाहिजे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

लाडक्या बहीण योजनेमुळे कंत्राटदारांचे पैसे अडकले

लाडकी बहीण योजना मार्गी लागेपर्यंत कोणत्याही विभागाकडून नव्या कामाला निधी देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील दीड कोटी महिलांनी अर्ज केले आहेत. 19 ऑगस्टला रक्षाबंधनाच्या दिवशी या योजनेचा पहिला हप्ता महिलांना दिला जाणार आहे. तोपर्यंत सरकारी कंत्राटदारांची देयके अदा केली जाणार नाहीत. कंत्राटदारांच्या बिलाच्या सर्व फाईल्स रोखून ठेवण्यात आल्या आहेत. लाडक्या बहि‍णींना ओवाळणी दिल्यानंतरच सरकार या कंत्राटदारांचे पैसे देणार आहे. 

राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला जातोय: संजय राऊत

राहुल गांधी गेल्या एक महिन्यापासून सरकारला त्यांचा आरसा दाखवत आहेत. त्यांनी मोदी आणि शाह यांना सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे राहुल गांधी असतील आम्ही सगळे असू. आम्हाला पुन्हा एकदा कारवाईला समोर जावे लागेल. आमची तयारी आहे, असे हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच परदेशी भूमीवर कट रचला जात आहे. राहुल गांधींसह आमच्यावर गुंडांच्या मदतीने हल्ला होऊ शकतो, असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला आहे. 

आणखी वाचा

लाडकी बहीण योजनेवर सरकारी पातळीवर पहिली नकार घंटा, अर्थ विभागाचे आक्षेप, बहिणींची ओवाळणी अडचणीत!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahim Vidhan Sabha : Sarvankar vs Sawant vs Thackeray; मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने?Manoj Jarange Vidhan Sabha : मनोज जरांगेंच्या भूमिकेचा अर्थ काय ?  परिणाम काय होणार ? Special ReportDevendra Fadnavis Kolhapur Speech : ...तर आम्ही सोबत येतो, भर सभेत फडणवीसांचं ठाकरेंना आव्हानEknath Shinde Kolhapur Speech:लाडकी बहीण ते शेतकऱ्यांना कर्जमाफी,मुख्यमंत्र्यांच्या 10 मोठ्या घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget