Konkan Refinery Project: कोकणातील रिफायनरी विदर्भात हलवा! नितीन गडकरींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
Nitin Gadkari: कोकणातील रिफायनरीबाबत आता वेगानं घडामोडी होताना दिसत आहेत. रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, असं शिवसेनेचं म्हणणं आहे.
Nitin Gadkari: कोकणातील रिफायनरीबाबत आता वेगानं घडामोडी होताना दिसत आहेत. रिफायनरी प्रकल्प राज्याबाहेर जाणार नाही, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तसेच ज्या ठिकाणी विरोध नाही त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्प होईल, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. दरम्यान, हे रिफायनरी प्रकल्प आता विदर्भात हलवा, असं पत्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं आहे. यापूर्वी 14 फेब्रुवारी रोजी नितीन गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंग पुरी यांना देखील या संदर्भात पत्र लिहिलं होतं. त्यानंतर आता त्यांनी याबाबतचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
यापूर्वी कोकणातील नाणारमध्ये या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध असल्याने तेथून हा प्रकल्प हटविण्यात आला होता. नंतर हा प्रकल्प राजापूरमध्ये होणार असल्याचे सरकराने सांगितले होते. आता येथे देखील या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी आपला विरोध दर्शवला आहे. आता याच पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी हे प्रकल्प विदर्भात हलवा, असं म्हटलं आहे. तसेच या प्रकल्पासाठी लागणारी रस्ते, वाहतूक व इतर सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी आपल्या या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, कोकणात या प्रकल्पाला होणाऱ्या विरोधामुळे नितीन गडकरी यांच्या या पत्राला महत्व प्राप्त झालं आहे. त्यांच्या या पत्रानंतर कोकणातील हे रिफायनरी प्रकल्प विदर्भात हलवण्यात येणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. तसेच गडकरी यांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर देतील, हे पाहावं लागले.
इतर महत्वाच्या बातम्या:
Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणेंना हायकोर्टाचा मोठा दिलासा, महापालिकेला दिला 'हा' आदेश
Shivsena : ...तर, सरसंघचालकांना जनाब सेना प्रमुख म्हणणार का? संजय राऊत यांचा भाजपला सवाल
Gopichand Padalkar : राऊतांनी आदित्य ठाकरेंना देशपातळीवर लाँच करुन फज्जा उडवला; गोपीचंद पडळकरांचा टोला