एक्स्प्लोर

Sanjay Shirsat: आता दोन्ही शिवसेना जोडायची वेळ आलेय, संजय शिरसाटांचं मोठं विधान; ठाकरे अन् शिंदे गट एकत्र येणार?

Sanjay Shirsat On Shivsena: एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय प्रवासासंदर्भातही भाष्य केलं आहे. 

Sanjay Shirsat On Shivsena: राज्यात सध्या शिवसेना शिंदे गटाचं (Shivsena Shinde Group) ऑपरेशन टायगर सुरु असल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि ठाकरे गटाचे मोठे नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. मात्र एकीकडे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच आता दोन्ही शिवसेना जोडण्यासंदर्भात मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना मोठं विधान केलं आहे. संजय शिरसाट यांच्या या भूमिकेवर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया दिली जाणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आता जोडण्याची वेळ आली असून अद्याप दोघांमधलं अंतर वाढलं नाही. त्यामुळे दोन्ही शिवसेना जोडता येतील, असं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय. दोन शिवसेना झाल्या याचं फार दुःख होत असून संधी मिळाल्यास उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मोठं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. दरम्यान या दोघांचे तार जोडले पाहिजेत. मात्र प्रयत्न एका बाजूने करून चालणार नाही, असंही संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये संजय शिरसाट यांनी त्यांच्या राजकीय प्रवासासंदर्भातही भाष्य केलं आहे. 

पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत-

राज्यात गेल्या दोन मोठ्या निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाल्याचं दिसून आलं. अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं, वेगवेगळ्या पक्षांमधून निवडणूक लढले, काहींना यश आलं तर काहींना अपयश आलं. त्यानंतर आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आमि महानगरपालिका निवडणुकांची रणनिती सर्वच पक्षांकडून आखली जात आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्ष कामाला लागले आहे. अशातच आता पुन्हा एकदा महाविकास आघाडीला महायुतीतील पक्ष धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस आणि ठाकरे गटातील पदाधिकारी आपल्या पक्षात घेण्याची स्पर्धाच महायुतीमध्ये सुरू झाल्या असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर-

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर अंतर्गत उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांना स्वतःच्या पक्षात आणण्याचे प्रयत्न होतायत . पुण्यातील हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेतलीय . उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे कोथरूडचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे हे देखील नाराज असल्याचं दिसून आलंय . त्यामुळं ते देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करणार का हा प्रश्न विचारला जातोय . तर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील एकनाथ शिंदेंची मुंबईत भेट घेतलीय . या भेटीनंतर आप्नविकास कामांसाठी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याचं आणि सध्या तरी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं असलं तरी त्यांच्या पक्षांतराची चर्चा देखील सुरु झाली आहे.

मंत्री संजय शिरसाट यांनी एबीपी माझाला दिलेली संपूर्ण मुलाखत, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray: यक्षाच्या 125 प्रश्नांच्या बरोबरीचा हा एकच प्रश्न; राज ठाकरेंच्या भूमिकेला सामनातून समर्थन

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi Donald Trump : एकीकडे भारत आणि अमेरिकेची ट्रेड डीलवर चर्चा सुरु, नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले
नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन फिरवला, चर्चेची माहिती देत म्हणाले..
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
एकनाथ शिंदेंनी थोडी लाज बाळगून टीका करायला हवी; आदित्य ठाकरे चांगलेच संतापले
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
Amit Shah: मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
मंदिर-दर्गा-दिवा, संसद ते विधिमंडळ; उद्धव ठाकरे अन् अमित शाहांमधील वाद नेमका काय?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी! केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग ; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
Embed widget