ऑपरेशन टायगरची जबाबदारी मंत्री प्रताप सरनाईकांवर, धाराशिवमध्ये शिंदे गटाच्या गळाला कोण? गोगावलेंचं मोठं वक्तव्य
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर (Minister Pratap Sarnaik) दिली असल्याचं वक्तव्य मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी केलं आहे.

Bharat Gogavale : धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर (Minister Pratap Sarnaik) दिली आहे. ते जे करामत करतील ते करतील असं मोठं वक्तव्य मंत्री भरत गोगावले (Bharat Gogavale) यांनी केलं आहे. मंगळवारी दोन मोठे पक्षप्रवेश होणार आहेत. तर 16 तारखेला देखील काही पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती गोगावले यांनी दिली आहे.
बरेचसे लोक शिंदे साहेब महायुतीच्या सरकारवर भरोसा ठेवून प्रवेश करू इच्छित आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. तुळजाभवानी चरणी पालकमंत्री पदाचं साकडं घातल्यानंतर शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवर मंत्री भरत गोगावले यांनी मोठं वक्तचव्य केलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी पहिल्याच धाराशिव दौऱ्यात ऑपरेशन टायगरबाबत सूचक विधान केलं होतं. त्यानंतर आता गोगावलेंनी देखील या वक्तव्याला दुजोरा देत धाराशिव जिल्ह्यातील ऑपरेशन टायगरची जबाबदारी पालकमंत्री प्रताप सरनाईकांवर असल्याचं म्हटलं आहे.
धाराशिवमध्ये बदल घडला तर नवल वाटायला नको, सरनाईकांचं वक्तव्य
धाराशिवमध्ये बदल घडला तर नवल वाटायला नको असं सूचक विधान प्रताप सरनाईक यांनी केला होते. धाराशिवचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या सरनाईक यांच्यासोबतच्या जवळीकीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. त्यामुळं आता धाराशीव जिल्ह्यात नेमकं काय होणार? ठाकरे गटाला धक्का बसणार का? शिंदे गटात कोण कोण पक्ष प्रवेश करणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत काय म्हणाले गोगावले?
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत (Guardian Minister of Raigad) लवकरच काहीतरी चांगलं होईल, जाताना तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन साकडे घालणार असल्याचं वक्तव्य मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांच्या हातात याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. चांगल काम करत राहणार आहे. स्वार्थ आणि आपलेपणा आम्ही कधी केला नाही. काम करण्याची जिद्द आहे. काम करणाऱ्यांना प्रोत्साहन द्या असेही गोगावले म्हणाले. शेतकरी नेते पाशा पटेल यांच्या फिनिक्स फाउंडेशन मार्फत बांबूची लागवड करणाऱ्या पर्यावरण युद्ध्यांना सन्मानित करण्याचा कार्यक्रमासाठी मंत्री भरत गोगवले, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर ते तुळजापूरला गेले होते. तिथे तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
Bharat Gogawale On Sunil Tatkare: सुनील तटकरेंनी आम्हाला पाडण्यासाठी सेटलमेंट केली; भरत गोगावलेंचा धक्कादायक आरोप
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

