खडसेंचं वय झालं पणं सोय आली नाही, मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसेंवर हल्लाबोल
एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे नेहमीच मी केले मी केले, असं म्हणत असतात. मात्र, मी मी करणाऱ्यांची काय अवस्था होते हे त्यांच्याकडे पाहून समजू शकता असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली.
Girish Mahajan on Eknath Khadse : एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे नेहमीच मी केले मी केले, असं म्हणत असतात. मात्र, मी मी करणाऱ्यांची काय अवस्था होते हे त्यांच्याकडे पाहून समजू शकता असे म्हणत मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंवर टीका केली. अनेक धरणे बांधल्याचे ते सांगतात, मग त्यांच्या मतदार संघात बोदवडमध्ये 15-15 दिवस लोकांना प्यायला पाणी का नाही? असा सवालही गिरीश महाजन यांनी केला. खडसेंचे वय झालं पणं सोय आली नाही असा टोलाही महाजन यांनी लगावला.
माझी आणि खडसेंची नार्को टेस्ट करा..
एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्यावर टीकेची झोड उठवल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांनी त्यांच्या जामनेर येथील कार्यकर्ता मेळाव्यात एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. खडसे हे नेहमीच मी केले मी केले असे म्हणत असतात. मात्र मी मी करणाऱ्यांची काय अवस्था होते हे त्यांच्याकडे पाहून समजू शकता असे महाजन म्हणाले. अनेक धरणे बांधल्याचे ते सांगतात, मग त्यांच्या मतदार संघात बोदवडमध्ये पंधरा पंधरा दिवस लोकांना प्यायला पाणी का नाही? असा सवाल त्यांनी केला. आपल्या बाबत नेहमीच ते फर्दापूर येथील घटनेबाबत वाईट साईट खोटं बोलत असतात. फर्दापूर घटना खरी आहे का खोटी याबाबत त्यांची आणि माझी दोघांची नार्को टेस्ट करायला हवी, म्हणजे कोण खरं आणि कोण खोटं हे जनतेच्या समोर येईल असेही खडसे म्हणाले.
दोन्ही नेत्यांतील कटुता काही केल्या कमी होत नाही
खडसेंचे वय झालं पणं सोय आली नाही अशी त्यांची परिस्थिती आहे. किती खालच्या थराला जाऊन ते अश्लील बोलतात. त्याचा विचार केला जाऊ शकत नाहीत असे महाजन म्हणाले. आपला पराभव करण्यासाठी ते जामनेरमध्ये येण्याचं सांगत आहेत. त्यांनी खुशाल मुक्कामाला यावे, मात्र तुमच्या गावात काही बोंब पाडता आली नाही तर इथे काय पडणार. इथलं पाणीच वेगळे असल्याचं सांगत मंत्री गिरीश महाजन यांनी खडसे यांच्यावर टीका केली. दरम्यान, या टीकेमुळं दोन्ही नेत्यांतील कटुता काही केल्या कमी होताना दिसत नसल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: