एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? गिरीश महाजनांनी सांगितलं मोठं राजकारण

Girish Mahajan on Majha katta : जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत माझा भाजपमध्ये पक्ष प्रवेश झाला होता. मात्र, भाजपने त्याबाबत घोषणा केलीच नाही, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसेंनी केला होता.

मुंबई : भाजपच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी मला पक्षात पुन्हा प्रवेश करण्याविषयी विचारले होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J P Nadda) यांच्या उपस्थितीत माझा पक्षप्रवेशही झाला होता. मात्र, यानंतर भाजपने (BJP) त्याबाबत घोषणा केलीच नाही. आता भाजपच्या पक्ष प्रवेशावर आता फुली मारल्याचे वक्तव्य ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी माझा कट्ट्यावर केले होते. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विरोध केल्याने माझा पक्ष प्रवेश झाला नसल्याचेदेखील काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी म्हटले होते. आता यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर एबीपी माझा कट्ट्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाला तुमचा विरोध होता का? असे विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, मी याबाबत नड्डा जी किंवा अमित शाह यांच्याशी बोललो नाही. त्यांनी किती वेळा दिल्लीला लोटांगण घातले हे तुम्हीच बघितले आहे. त्यांचे दिल्लीतील फोटो किती वेळा बाहेर आले? ते दिल्लीला गेले, मला पक्षात घ्या म्हणत पण पक्षाला गरज नाही. तुम्ही एकदा सोडून गेले, पक्षाला एवढा शिवीगाळ केला. देवेंद्रजींबद्दल इतके अभद्र बोलले. आम्हाला गरज नाही. 

सुनेच्या तिकिटासाठी दिल्लीला लोटांगण घातले

तुम्ही तिथे लोटांगण घालायचे आणि परत सांगायचे मला तिथे बोलावले होते. हा कुठला प्रकार आहे? सुनेच्या तिकिटासाठी दिल्लीला लोटांगण घातले. मी पुन्हा पक्षात येतो जे झालं ते विसरून जा हे त्यांनीच केलं. माझा काही रक्षा खडसेंना विरोध नव्हता. मी एक शब्द पण रक्षा खडसेंना तिकीट देऊ नका असे बोललो नाही. मला बोलायचं असतं तर मी बोललो असतो. मला बोलण्यासाठी काही कठीण पण नव्हते. पण मी बोललो नाही कारण तिचे काम चांगले आहे. रक्षा खडसेंना तिकीट मिळावे म्हणून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार होते का? असे विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की, तिकिटासाठी काय, त्यांचे सगळे पाप झाकण्यासाठी काय, 137 कोटींचा प्रकरण दाबण्यासाठी ते प्रयत्न करत होते. पण त्यात त्यांना कोणीच वाचवू शकत नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा 

Girish Mahajan on Majha Katta : एकनाथ खडसे अन् माझी नार्को टेस्ट करा, गिरीश महाजनांचं माझा कट्ट्यावर ओपन चॅलेंज!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter : बंदूक हिसकावल्यापासून ते API वर गोळीबारपर्यंत, नेमका कसा झाला एन्काऊंटर?Akshay Shinde Encounter : मुंब्रा बायपासवर पोलिसांची गाडी आली, अन् घडला थरार; एन्काऊंटरची स्टोरीPune Road Potholes वास्तव 82 : PM मोदींचा दौरा, रस्त्यांची डागडुजी,निकृष्ट कामामुळे नागरिकांचा संतापImtiyaz Jalil Tiranga Rally : इम्तियाज जलीलांची रॅली मुंबईच्या दिशेने, ठाण्यात परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
कसाबने कधी तुमची रिव्हाॅल्वर काढली नाही; कसाबपेक्षा चांगली ट्रेनिंग घेतली होती का? मेहबूब शेख यांचा एन्काउंटरवर करडा सवाल
Sharad Pawar: कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहीजे होती, परंतू...; एन्काऊंटवर शरद पवार स्पष्टच बोलले
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
अक्षय शिंदे जेवढा दोषी तितकाच शाळा चालक भाजप पदाधिकारी दोषी; प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह; अनिल देशमुखांचा थेट आरोप
Badlapur Encounter पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
पोलिसांची बंदूक साधारणत: लॉक असते; अक्षय शिंदे एन्काऊंटवर वकील असीम सरोदेंचे सवाल
Nana Patole on Akshay Shinde Encounter : बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
बदलापूर प्रकरणातील फरार आरोपींना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Badlapur Case Accused Akshay Shinde : एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
एन्काउंटर केला की कायद्याची हत्या केली? सुषमा अंधारेंचा पोलिसांवर बनावटगिरीचा आरोप
Badlapur Encounter : ''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
''संस्थाचालकांवर कारवाई होत नाही, पण आरोपी गोळी झाडून घेतो हे धक्कादायक अन् संशयास्पद''
Amol Kolhe on Akshay Shinde Encounter :'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
'ते सरकार वाचवण्यामध्येच मशगुल', अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर अमोल कोल्हेंचा गृहमंत्र्यांवर थेट निशाणा
Embed widget