(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milind Narvekar Meets Sharad Pawar : पहिल्या पसंतीच्या 23 मतांची जुळवाजुळव, शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, नार्वेकरांनी कंबर कसली, भाजप नेत्यांशीही येता-जाता चर्चा
Milind Narvekar Meets Sharad Pawar, Mumbai : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी कंबर कसलीये.
Milind Narvekar Meets Sharad Pawar, Mumbai : ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषद निवडणुकीसाठी कंबर कसलीये. उद्धव ठाकरेंसोबत येत उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मिलिंद नार्वेकर अॅक्शन मोडवर आले आहेत. यापूर्वी त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याशी कोपऱ्यात जात चर्चा केली असल्याची समोर आले होते. याशिवाय भाजप नेते आशिष शेलार यांच्याही नार्वेकर चर्चा करताना दिसले होते. आता मिलिंद नार्वेकर यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेत आशीर्वाद घेतले आहेत. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे शिलेदार कशी जुळवाजुळवी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मिलिंद नार्वेकरांनी शरद पवारांच्या भेटीबाबत ट्वीटरवरुन माहिती दिली
मिलिंद नार्वेकरांनी शरद पवारांच्या भेटीबाबतचा तपशील ट्वीटरवरुन माहिती दिली आहे. "माझा विधानपरिषदेसाठीचा अर्ज भरल्यानंतर आज प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच मविआच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले", असं मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवारांनी अर्ज भरला होता. त्यामुळे 12 वा कोणता उमेदवार माघार घेणार का? याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, आज उमेदवारी अर्ज घेण्याची तारीख संपली आहे. त्यामुळे कोणत्याही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. ऐनवेळी ठाकरेंचे शिलेदार माघार घेतील, अशीही चर्चा होती. मात्र, माघार न घेता मिलिंद नार्वेकरांनी विधानपरिषदेसाठी जोर लावला आहे.
नार्वेकरांना प्रथम क्रमांकाच्या 23 मतांची जुळवाजुळव
मिलिंद नार्वेकरांना विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रथम क्रमांकाच्या 23 मतांची आवश्यकता आहे. उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जात असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही त्यांच्यासाठी ताकद लावल्याचे दिसून आले होते. नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरेंशिवाय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसेच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे महाराष्ट्र अध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते. नार्वेकर यांच्या उमेदवारीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर आपल्या आमदारांना एकसंध ठेवण्याचे आव्हान असणार आहे.
माझा विधानपरिषदेसाठीचा अर्ज भरल्यानंतर आज प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय श्री. शरदचंद्र पवार (@PawarSpeaks) साहेब तसेच मविआच्या इतर ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले.@OfficeofUT साहेब, @AUThackeray जी, @prithvrj जी, @rautsanjay61 जी,… pic.twitter.com/e9eLnQLtDU
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) July 5, 2024
इतर महत्वाच्या बातम्या