एक्स्प्लोर

Marathi Language Row: त्रिभाषा धोरण लागू झाल्यास राज्यात 20 हजार परप्रांतीय शिक्षकांना मिळणार नोकऱ्या, 'ती' महत्त्वाची अटही रद्द करणार?

Marathi Language Row: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या सरकारच्या निर्णयाला जोरदार विरोध झाला आहे. त्यामुळे हा निर्णय सरकारला रद्द करावा लागला होता.

Marathi Language Row Hindi in school: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण राबवण्याचा शासन आदेश महायुतीला सरकाराला प्रचंड विरोधामुळे मागे घ्यायला लागला. त्रिभाषा धोरण लागू झाले असते तर महाराष्ट्रातील शाळांमध्ये तिसरी भाषा (Third Language) म्हणून बहुतांश विद्यार्थ्यांना पहिलीपासून हिंदी (Hindi) भाषेचे धडे गिरवणे अनिवार्य झाले असते. मात्र, राज-उद्धव ठाकरे आणि अन्य पक्षीयांच्या प्रखर विरोधामुळे महायुती सरकारला राज्यात इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा धोरण(Tri Language Policy) राबवण्याचा निर्णय तुर्तास बासनात गुंडाळावा लागला होता. परंतु, सरकारने माजी कुलगुरू व शिक्षणतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. त्रिभाषा सूत्र पहिलीपासून राबवायचे की नाही, याचा अहवाल तीन महिन्यांत देण्याच्या सूचना या समितीला देण्यात आल्या होत्या. विरोधकांनी नरेंद्र जाधव यांच्या या समितीच्या निष्पक्षतेबाबत शंकाही उपस्थित केली होती. या समितीने पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत सकारात्मक अहवाल दिल्यास भविष्यात शाळांमध्ये तिसरी भाषा शिकवली जाईल. मात्र, त्यामुळे राज्यभरातील शाळांमध्ये तब्बल 20 हजार परप्रांतीय शिक्षकांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे, असे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'ने प्रसिद्ध केले आहे.

राज्यात पहिलीपासून त्रिभाषा धोरण लागू झाल्यास बहुतांश विद्यार्थी आणि पालकांना हिंदी भाषेलाच पसंती द्यावी लागेल, अशी परिस्थिती आहे. परंतु, राज्यात हिंदी भाषा शिकवणारे बीएड पदवीधारक शिक्षक उपलब्ध न झाल्यास अन्य राज्यांमधील शिक्षकांची नेमणूक करण्याची मुभा राष्ट्रीय शिक्षण धोरणातच देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातील शाळांमध्ये अनेक परप्रांतीय शिक्षकांना नोकरीची आयती संधी मिळू शकते. तसेच परप्रांतीय हिंदी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी अधिवास प्रमाणपत्राची (डोमिसाईल) अटदेखील राज्य सरकारला बाजूला ठेवावी लागेल. तसे घडल्यास भविष्यात या सगळ्यामुळे कशाप्रकारचे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटतील, हे पाहावे लागेल.

Hindi Language in school: हिंदी भाषक राज्यांतील शिक्षकांनाच प्राधान्य का मिळणार?

राज्यात सध्याच्या घडीला बीएड अभ्यासक्रमाच्या 35 हजार जागा आहेत. यापैकी तीन ते चार हजार विद्यार्थी बीएडसाठी हिंदी विषय निवडतात. त्रिभाषा धोरणातंर्गत पहिलीपासून हिंदी भाषा शिकवायची झाल्यास इतर विषयाच्या शिक्षकांनाच हिंदी शिकवण्याचे काम द्यावे लागेल. मात्र, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तसे करता येणार नाही. तिसरी भाषा किंवा पर्यायी भाषा शिकवण्यासाठी शिक्षकच उपलब्ध नसल्यास अन्य राज्यांमधून शिक्षक आयात करण्याची मुभा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने दिली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी विषय घेऊन बीएड होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवायची झाल्यास महाराष्ट्रातील शाळांमध्ये 30 ते 35 हजार परप्रांतीय शिक्षकांची नियुक्ती करावी लागेल. 

आणखी वाचा

ठाकरेंच्या हिंदी सक्तीविरोधी लढ्याला तामिळनाडूचा पाठिंबा, महाराष्ट्राचे आंदोलन नवी उर्जा देणारे, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची पोस्ट

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
आठवडा झाला तरी 'एबी फॉर्म' सापडेना, अपक्ष उमेदवार राष्ट्रवादीचा कसा झाला? पिंपरीतील आयुक्तांनी दिलं उत्तर
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Embed widget