Manoj Jarange: सरकारने पद्धतशीरपणे गुंड मित्र वाचवला, गुंड मित्राची टोळी वाचवली, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप, म्हणाले..
पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे पाटलांनी दिलेत.

Manoj Jarange: सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात खोटा अजेंडा राबवून धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं नाही. सरकारनं पद्धतशीरपणे गुंड मित्र वाचवला. गुंड मित्राची टोळी वाचवली. असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटलांनी सरकारवर केलाय. उज्वल निकमांच्या नियुक्तीनंतर दाखल झालेल्या चार्जशीटमध्ये नव्याने सहआरोपी वाढतील असे संकेत आमदार सुरेश धसांनी शनिवारी दिला होता. मात्र, आता या प्रकरणात नव्याने आरोपी दाखल होतील यावर शंका असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. पुण्यातील खेडमध्ये ते बोलत होते. आता खून खंडणी जमिनी बळकविण्याचे प्रकार घडल्यास यांच्या टोळीला सुट्टी नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. (Manoj Jarange) संतोष देशमुख प्रकरणात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर चार्जशीट दाखल झाल्याने पुरवणी आरोपपत्रात सहआरोपी होतीलच अशी शंका असल्याने या प्रकरणात धनंजय मुंडेना क्लीनचिट असल्याचे स्पष्ट संकेत जरांगे पाटलांनी दिलेत. (Dhananjay Munde)
राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली, जरांगेंचा आरोप
संतोष देशमुख प्रकरणाचे चार्जशीट अजुन दोन महिने दाखल होणार नाही, अशी आपेक्षा होती. त्या चार्जशीटमध्ये फोडाफोडी होणार नाही यासाठी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती मागितली. मात्र त्यांच्या नियुक्तीच्या दुसऱ्या दिवशीच चार्जशीट दाखल केल्याने आता धनंजय मुंडे सहआरोपी होता होता वाचले. छुपा राजकीय अजेंडा चालवून गुंड आणि राजकिय मित्र वाचवला. मात्र तुमच्या पक्षाचा प्रामणिक सरपंचाला न्याय देऊ शकला नाही. सरकारच्या प्रतिनिधींनी पद्धतशीरपणे त्यांचे राजकीय गुंड मित्रासह टोळीही वाचवली. मात्र, पुढील तपासात काही सहआरोपी होतात का पाहू. मात्र न झाल्यास पुढील काळात त्रास देणा-या टोळीकडे आमची मोहिम असेल असे मनोज जरांगे म्हणाले.
'या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाला. अजेंडा राबवला गेला नाहीतर यातच दीडशे सहआरोपी झाले असते.पुढच्या काळात यांनी कोणाला मारणं, कट करणं, गाड्या अडवणं,प्लॉट हडपणं, खंडण्या मागण्याचे प्रकार मराठ्यांसोबत झाले तर आम्ही त्यांच्याकडे मोर्चा वळवणार. त्यांना आत टाकणारच असा इशाराही जरांगे पाटील म्हणाले. एकीकडे उज्वल निकम यांच्या नियुक्ती झाली. पण पुरवणी तपासात सहआरोपी होतील की नाही याची शंका आहे. या अहवालातून समोर येईल. उज्वल निकमांच्या नियुक्तीसाठी मागणी यासाठी होती की चार्जशीटमध्ये फोडाफोडी होऊ नये. अफरातफर होऊ नये. देशमुख कुटुंबाचं असं म्हणणं होतं, अजून दोन महिने चार्जशीट दाखल होणार नाही. पण नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी चार्जशीट दाखल झाली. याचा अर्थ सहआरोपी दाखल होणार नाहीत. जो कोण बडा नेता या सगळ्यात उभा होता तो आरोपी होणार होता. त्याच्या मदतीशिवाय हे सगळं घडणं शक्यच नव्हतं. पण तुम्ही गुंड मित्र वाचवला. तुम्ही पद्धतशीरपणे तुमचा मित्र वाचवला.त्याचा पक्ष वाचवला. पण तुमच्या पक्षाचा एक सरपंच जो बुथवर थांबला होता, त्याला न्याय देऊ शकत नाहीत.एक गुंड वाचवायचा. गुंड मित्राची टोळी वाचवायची. देशमुख कुटुंबियांचं कुटुंब उघड्यावर पडलंय. त्यांच्या लेकीला ना शाळेत जाता येतं ना कुठं हलता येतंय.' न्याय द्यायचा सोडुन भलतीकडेच प्रकरण नेल्याचा आरोपही जरांगेंनी सरकारवर केला.
हेही वाचा:























