एक्स्प्लोर

Manoj jarange: देवेंद्र फडणवीसांना कितीही गणित करु द्या, मी त्यांची सगळी गणितं फेल करणार; मनोज जरांगेंचा एल्गार

मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करियर उध्वस्त करून टाकेन असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय.

Manoj Jarange:  मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे यांना सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारला फटकारल्याचं दिसून आलं. फडणवीसांनी कितीही गणित करू द्या मी त्यांची सगळी गणितं फेल करणार असा एल्गारच मनोज जरांगेंनी पुकारलाय. ते म्हणाले, तुम्ही महराष्ट्राच्या मराठ्यांना मूर्ख समजता का? असा सवाल करत मी राजकीय वाटेवर आले तर तुमचा खेळ खल्लास असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करियर उध्वस्त करून टाकेन असा इशाराही त्यांनी सरकारला दिलाय.

अजून किती सहकार्य करायचं?

भारतात अशी जात नसेल ज्यांना वर्षभर सरकारला सहकार्य केलं ती मराठा जात आहे आम्हाला काहीतरी मर्यादा आहेत, आमच्यावर काही समाजाची जबाबदारी आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता ?आणि कशाला चालवतात?  असा सवाल जरांगे यांनी केलाय. उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे, लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःलाच एक वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकत नाहीयेत. असंही जरांगे म्हणाले.

सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो

धनगर, मुस्लिम ,दलित, गोरगरीब ओबीसी ना वेड्यात काढतात. फडणीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सगळ्या विषयाची अंमलबजावणी करा. मुख्यमंत्र्याच्या पोटात काही नाही म्हणत आहेत तर आम्ही तेच म्हणत आहोत म्हणूनच वर्षभर आम्ही सहकार्य केलं अजून किती दिवस निवडणुका तुमचा पोळा जवळ आला. त्याच्यानंतर मात्र मी नीटच करणार, सध्या कोणावर बोलणार नाही मात्र नंतर सगळ्यांचाच हिशोब करतो. असं जरांगे म्हणालेत. धनगरांना आणि सर्वांनाच मुसलमानांना देखील फडणवीसंच अडथळा होता .शेतकऱ्यांच्या प्रश्नाला देखील तेच अडथळा आहेत गोरगरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहेत.सरपंचाचा काही उपयोग नाही सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो, देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात, सरपंचाच्या हातात काही नाही. असे जरांगे म्हणालेत.

मी राजकारणात आलो तर तुमचा खेळ खल्लास

दुसऱ्याला मूर्ख समजायला लागले दोन-तीन दिवस सगळे विषय मार्गे लावा ,जास्त नाटक करायचं नाहीत प्रक्रिया चालू आहे वाचत आहोत हरकती आले आहेत ,हे बघतो ते बघतो ,केसेस पोलीस बघतात हे नाटक करायचे नाहीत. मी रस्त्यावर आलो राजकीय वाटेवर आलो तर खेळ खाल्लास तुमचा. असा इशारा मनोज जरांगे यांनी दिलाय.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Prithviraj Chavan : कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी नावं काढली असती तर कदाचित निकाल वेगळा असता: पृथ्वीराज चव्हाण
कराड दक्षिण मतदारसंघात 58 हजार दुबार नावं, निवडणुकीपूर्वी लेखी निवेदन दिलेलं पण... : पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget