संतोष देशमुखांचा भाऊ मनोज जरांगेंसोबत बसला असताना वाल्मिक कराडांच्या सरेंडरची बातमी आली अन्....
संतोष देशमुख यांचे भाऊ मनोज जरांगेंसोबत बसले असतानाच वाल्मीक कराड यांच्या सरेंडरची बातमी समोर आली . त्यानंतर मनोज जरांगेंसह धनंजय देशमुख यांनी या शरणागतीवर प्रतिक्रिया दिली आहे .
Santosh Deshmukh Case :गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड(Walmik Karad) यांनी मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले . मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृण हत्या करण्यात आली होती . ही हत्या वाल्मीक कराड यांच्या सांगण्यावरून झाली असा आरोप केला जात आहे . तब्बल 23 दिवस पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर स्वतःहून वाल्मीक कराड यांनी शरणागती पत्करली . दरम्यान संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे मनोज जरांगे भेटीसाठी अंतर्वली सराटीमध्ये आले आहेत . संतोष देशमुख यांचे भाऊ मनोज जरांगेंसोबत बसले असतानाच वाल्मीक कराड यांच्या सरेंडरची बातमी समोर आली . त्यानंतर मनोज जरांगेंसह धनंजय देशमुख यांनी या शरणागतीवर प्रतिक्रिया दिली आहे .
कुठे नखही दिसता कामा नये- जरांगे
'कुटुंब दहशतीखाली आहे. भावाची हत्या झाल्यामुळे त्यांच्या भावाची निर्घृण हत्या झाल्यानं ते दहशतीखाली आहेत.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला संरक्षण पुरवण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली . कुटुंब दहशतीखाली आहे हे लोक गुंडगिरी करणारे आहेत . त्यामुळे बीड जिल्ह्यात कुठेही काडीही वाजता कामा नये .कुठे नखही दिसता कामा नये . हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे असं जरंगे म्हणाले . त्यांना न्याय मिळायला पाहिजे . त्यांच्यामागे सगळा समाज पाठीशी आहे .
धनंजय देशमुख म्हणाले ..
कोण आरोपी आहे कोण नाही हे यंत्रणा ठरवेल . वाल्मीक कराड आरोपी आहे की नाही कसे ठरवतील ? असं धनंजय देशमुख म्हणाले . यंत्रणा वदवल्याशिवाय कसं राहील . जे सत्य आहे ते समोर येईल . त्यासाठी थोडा वेळ जाईल .23 दिवस पोलिसांना गुंगारा देत वाल्मीक कराडांनी अखेर शरणागती पत्करल्यानंतर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे . दरम्यान पोलिसांच्या तपासावर समाधानी आहात का विचारल्यावर संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले,त्यांच्या प्रामाणिक प्रयत्न होते . हे काम करताना आम्ही जरी त्यांनी आम्ही त्यांना जास्त डिस्टर्ब केलं नाही . पण मी काल सीआयडी ऑफिसला गेलो होतो . त्यांना भेटलो सगळ्यांना त्यांनी हेच आश्वासन दिलं होतं . एक-दोन दिवसांमध्ये आरोपी आम्ही जेल बंद करू असे ते काल बोलले होते आणि आज आरोपी जेरबंद झालेला आहे .
प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो ती पहिल्यापासून आहे . माझी आरोपीला अटक करून शिक्षा द्या हा त्याचाच एक हा भाग आहे . त्याच्यामुळे बाकीच्या आरोपींना लवकरात लवकर पकडा .सर आरोपी शोधा सगळे सीडीआर काढून जे कोणी याच्या दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या . ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात अश्वस्त केले की याच्यातून कोणीही सोडणार नाही .. कोणीही असू द्या . जे आरोपी त्यांना शिक्षा देणार . पुढील कारवाई पण लवकरात लवकर करावी .
हेही वाचा: