एक्स्प्लोर

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात थेट सहभागी होणार ठाकरेंच्या शिवसेनेचा दुसरा खासदार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबई येथे मोर्चा काढून आझाद मैदानावर आंदोलनास बसणार आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईची वाट धरली आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत गणपतीची आरती करुन जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात मोर्चासाठी रवाना झाले आहेत. दुसरीकडे ओबीसी समाजानेही जरांगे पाटील (Manoj jarange) यांच्या आंदोलनास विरोध करत साखळी उपोषणातून आपली भूमिका स्पष्ट केलीय. मात्र, गावागावात जरांगे पाटील यांचे जोरदार जल्लोषात स्वागत होत असून सत्कार करत मराठा युवक आंदोलनात सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena) परभणीतील खासदार संजय बंडू जाधव यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभागी होण्याची घोषणा केली होती. आता, आणखी एका हिंगोलीतील (Hingoli) खासदाराने जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवत आंदोलनात सहभागी होणार असल्याचं स्पष्ट केलं. 

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मुंबई येथे मोर्चा काढून आझाद मैदानावर आंदोलनास बसणार आहेत. या आंदोलनामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे सुद्धा सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी परभणीचे खासदार बंडू जाधव यांनीही आपली भूमिका जाहीर करत जरांगे पाटलांच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ''मनोज जरांगे यांना 5 हजार आंदोलक घेऊन एक दिवस आंदोलनाची संधी मिळाली, तो कोर्टाचा प्राथमिक निर्णय होता. जरांगे पाटील हे शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत आहेत, त्यामुळे या मोर्चाची सरकारला काही अडचण नसावी. जरांगे यांच्या आंदोलनास ज्यांना जायचं आहे, ते सर्वजण निघालेले आहेत. उद्या सकाळी मी मुंबईला निघणार आहे, आणि त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे,'' असे खासदार नागेश आष्टीकर यांनी म्हटले. 

आठवलेंचाही आंदोलनास पाठिंबा (Ramdas athavale)

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा पाठिंबा आहे. तर, महायुतीमधील रिपाइं आठवले गटाचे प्रमुख मंत्री रामदास आठवले यानीही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र, मराठा आरक्षणास आपला पाठिंबा असून आंदोलनातील प्रमुख मागणी असलेल्या ओबीसीतून आरक्षणास आपला पाठिंबा नसल्याचे त्यांनी जाहीर केले. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

हेही वाचा

मनोज जरांगेंच्या आंदोलनास रामदास आठवलेंचा पाठिंबा, पण..; आरपीआयच्या शिबिरात ठराव मंजूर

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More

महत्त्वाच्या बातम्या

माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
माझा भाऊ मंत्री होऊ दे, भाऊबीजनिमित्त सुषमा अंधारेंच्या धनंजय मुंडेंना शुभेच्छा, म्हणाल्या, परळीला सत्ताकेंद्र असण्याची सवय
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
अजित पवार महायुती सोडणार होते, अतुल लोढेंचं मोठं वक्तव्य, उमेश पाटील म्हणाले दाव्याचा ठोस पुरावा नेमका काय? 
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा, सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर तटकरेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
संपत्तीपुढे नात्याचं मोलच नाही; कल्याणमध्ये वडिलांसह सख्ख्या भावावर झाडल्या गोळ्या, मुलगा अटकेत
Kavya Maran Marriage : काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, लग्नाचे फोटो शेअर करताच शुभेच्छांचा पाऊस
काव्या मारन-अनिरुद्ध रविचंदर विवाहबंधनात अडकले, ग्रीसमध्ये विवाहसोहळा संपन्न, रजनीकांत यांची हजेरी
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकसरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
Embed widget