एक्स्प्लोर

Manmohan Singh Death : नम्र अर्थतज्ज्ञ, विनयशीलता-करुणेचे प्रतीक, भारताला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या कार्याचा पाया रचला, मनमोहन सिंहांच्या जाण्याने राजकीय क्षेत्र हळहळलं

Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे आज (दि.26) निधन झाले.

Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे आज (दि.26) निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंह यांच्या जाण्याने संपूर्ण देशातून शोक व्यक्त करण्यात येतोय. शिवाय राजकीय क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

नम्र व्यक्ती ते प्रतिष्ठित अर्थतज्ज्ञ असा प्रवास मनमोहन सिंह यांनी केला. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचे कामही अभ्यासपूर्ण होते. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. 

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय रिजर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वार त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॅा मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली. 

देशाने अर्थतज्ञ गमावला - देवेंद्र फडणवीस

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, अर्थमंत्री, पंतप्रधान अशा विविध भूमिकांमधून त्यांनी काम केले आणि देशवासियांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. भारताच्या राजकारणात स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अर्थशास्त्राशी संबंधित विपूल लेखन सुद्धा त्यांनी केले. त्यांनी केलेले कार्य कायम देशवासियांच्या स्मरणात राहील. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. हे दु:ख सहन करण्याची शक्ती त्यांच्या कुटुंबीयांना लाभो, अशी मी प्रार्थना करतो.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी - अर्थमंत्री अजित पवार

भारतासारख्या विकसनशील देशाला जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या वाटेवर नेण्याचा क्रांतिकारी निर्णय घेणारे आणि तो निर्णय कमालीचा यशस्वी करुन दाखवणारे देशाचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ञ डॉ. मनमोहनसिंह यांचं निधन ही देशाच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्राची मोठी हानी आहे. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या कार्याचा पाया डॉ. मनमोहनसिंह यांनी रचला. गेल्या अनेक दशकात आलेल्या प्रत्येक जागतिक मंदीसमोर भारताची अर्थव्यवस्था पाय घट्ट रोवून भक्कमपणे उभी राहिली, याचं बहुतांश श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्याकाळात घेतलेल्या दूरदष्टीपूर्ण निर्णयांना आहे, असे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी डॉ. मनमोहनसिंह यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना आदरांजली वाहिली.  

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, डॉ. मनमोहनसिंह यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून यशस्वीपणे काम केलं. जागतिक अर्थव्यवस्थेचा सखोल अभ्यास, दूरदष्टीपूर्ण निर्णय घेण्याची क्षमता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाचा ध्यास या बळावर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्था कठीण परिस्थितीतून रुळावर आणली. अर्थव्यवस्थेचा पाया अधिक मजबूत केला. मजबूत अर्थव्यवस्थेचा उपयोग समाजाला होईल याची काळजी  घेतली. भारतीय अर्थव्यवस्थेला आज जे मजबूत स्वरुप प्राप्त झाले आहे, त्याचं मोठं श्रेय डॉ. मनमोहनसिंह यांना आहे. त्यांच्या निधनाने देशाचं सभ्य, सुसंस्कृत, विश्वासार्ह नेतृत्वं हरपलं आहे. देश आपल्या सुपुत्राला मुकला आहे. देशाचे यशस्वी अर्थमंत्री, साहसी पंतप्रधान आणि जनमानसाचा विश्वास प्राप्त केलेला नेता म्हणून ते कायम स्मरणात राहतील.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manmohan Singh : अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad Judicial Custody : वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पुढे काय?ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 22 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सPune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळलीRadhakrishna Vikhe Patil : दुर्लक्ष करा जरा,गाड्या चालू द्या; वाळू माफियांना अप्रत्यक्ष अभय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jos Buttler on BCCI Rule : बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
बीसीआयआयने खेळाडूंच्या बायका पोरांसाठी कडक नियम आणले, पण इंग्लंड कॅप्टन जोस बटलरच्या उत्तराने भूवया उंचावल्या!
PM Kisan : पीएम किसानच्या 19 व्या हप्त्याचे  2000 रुपये मिळण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम, अन्यथा...
पीएम किसानचे 18 हप्त्यात 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 मिळवण्यासाठी करावं लागेल महत्त्वाचं काम
Walmik Karad: पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
पहिल्या पत्नीपेक्षा दुसऱ्या पत्नीच्या नावे चौपट संपत्ती, वाल्मिक कराडच्या दोन्ही पत्नींच्या नावे किती मालमत्ता?
IND vs ENG 1st T20 : टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
टीम इंडियासाठी धोक्याची घंटा, इंग्रंजांविरुद्ध सावध राहावं लागणार; कोलकाता सामन्यापूर्वी हे रेकॉर्ड पाहाच!
Dhananjay Munde : वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
वाल्मिक कराडविरोधात मोठा पुरावा हाती लागला; धनंजय मुंडे म्हणाले, मी स्पष्ट सांगितलंय...
Team India Playing XI : प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
प्लेइंग-11 बाबत टीम इंडियामध्ये अडचण, सूर्या कोणाला बसवणार अन् कोणाला संधी, कोलकाता पहिल्या टी-20 मध्ये ही असेल टीम?
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Pune Reverse Car Accident : पुण्यात रिव्हर्स गिअरने अनर्थ, कार पहिल्या मजल्यावरुन कोसळली
Sanjay Raut: ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार फुटणार; उदय सामंतांच्या दाव्यावर संजय राऊत भडकले
Embed widget