एक्स्प्लोर

Manikrao Kokate: नाशिक पोलिसांनी लीलावती रुग्णालयात पाऊल ठेवताच माणिकराव कोकाटेंची प्रकृती आणखी बिघडली? अँजिओग्राफी होण्याची शक्यता

Mumbai: माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकाटे यांचा उच्चरक्त दाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डाॅक्टरांनी पोलिसांना दिलीय.

मुंबई : नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा लागला. तर दुसरीकडे नाशिक सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर रक्तदाब वाढल्यानं माणिकराव कोकाटे मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल झालेत. दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या प्रकृती संदर्भात (Manikrao Kokate Health Update) आता एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कोकाटे यांचा उच्चरक्त दाबाचा त्रास लक्षात घेता त्यांना विश्रांतीची गरज असल्याची माहिती डाॅक्टरांनी पोलिसांना (Nashik Police) दिलीय.

सध्या कोकाटेंवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर उच्च रक्तदाबाचा होणारा त्रास हा नियंत्रणात नसल्याने पुढील काही दिवस देखरेखेखाली ठेवणे गरजेचे असल्याचे मत डाॅक्टरांनी पोलिसांकडे व्यक्त केल्याचे कळतंय.

Manikrao Kokate Health Update : डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज अँजिओग्राफी केली जाण्याची शक्यता

दरम्यान, वैदयकिय अहवाल आणि तज्ञ डाॅक्टरांचे मत लक्षात घेता NBW वाॅरंट पोलिस रुग्णालयात दिलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे अटकेची कारवाई होण्याची शक्यता सध्या तरी कमी असल्याचे बोललं जात आहे. अशातच, माणिकराव कोकाटे यांची डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आज सकाळी अँजिओग्राफी केली जाण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर डॉक्टर त्यांच्या डिस्चार्ज संदर्भात निर्णय देणार. अशी देखील माहिती आता समोर आली आहे. परिणामी, अँजिओग्राफीच्या रिपोर्टनंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Nashik Police: नाशिक पोलीस नेमकं काय म्हणाले?

नाशिक पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिलावती रुग्णालयातील रात्रपाळीचे इंचार्ज डाॅ.कुलदिप देवरे यांचा जबाब आम्ही नोंदवलेला आहे. रुग्णालय प्रशासन यांच्याकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचाराची माहिती अहवाल घेतलेला आहे. तसेच पुढे काय उपचार करणं अपेक्षित आहे, याबातची माहिती लेखी स्वरुपात मागितली आहे. आम्ही कोर्टाच्या आदेशाचे पालन करत आहोत. जोपर्यंत पुढील वैद्यकिय कारवाई काय केली जाणार, याचा अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबणं क्रमप्राप्त आहे. नाशिकहून आलेल्या पोलिसांच्या पथकात महिला पोलिस नसल्याने वांद्रे पोलिसांकडून मदत घेतली आहे. रुग्णालय प्रशासनाकडूनही न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल, असे आश्वासित केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे कोणत्या प्रकरणामुळं अडचणीत? 

नाशिक शहरातील उच्चभ्रू परिसरात माणिकराव कोकाटे यांनी 30 वर्षांपूर्वी कमी उत्पन्न दाखवत अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. स्वत:सह भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे आणि प्रशांत गोवर्धने या चार जणांनी कॅनडा कॉर्नर भागात निर्माण व्ह्यू अपार्टमेंटमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका प्राप्त केल्या होत्या. या प्रकरणी फेब्रुवारी 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. यावर माणिकराव कोकाटे यांनी नाशिक सत्र न्यायालयात अपिल केलं होतं. सत्र न्यायालयानं शिक्षा कायम ठेवली. माणिकराव कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. माननीय न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सदस्य व पक्षातील आमचे सहकारी श्री. माणिकराव कोकाटे यांनी आपला राजीनामा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. कायदे-नियम हे सर्वोच्च स्थानी असून ते कोणत्याही व्यक्तीपेक्षा सर्वोतोपरी आहेत.

माणिकराव कोकाटे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांचं पथक मुंबईत पोहोचलं आहे. या पथकात दहा हवालदार तीन अधिकारी अशा एकूण 13 जणांचा समावेश आहे. आता लीलावती रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या भूमिकेवर आणि वैद्यकीय अहवालावर कोकाटे यांना अटक होणार की नाही हे अवलंबून आहे.  

महत्वाच्या बातम्या:

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Ajit Pawar On Manikrao Kokate : अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Dhangekar : पुण्यात महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
महायुतीच्या पहिल्याच बैठकीत धंगेकरांना ‘नो एंट्री’, भाजपची साथ महत्त्वाची; धंगेकर दुय्यम? शिंदेंच्या सेनेचा स्पष्ट संदेश
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
Maharashtra Live Updates: विठ्ठल रुक्मिणी मूर्ती पूर्णपणे सुरक्षित, पुरातत्व विभागाचा अहवाल शासनाकडे पाठवला
BJP : भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
भाजप महापालिका निवडणुकीत भाकरी फिरवणार, 20 ते 25 टक्के नगरसेवकांना डच्चू देणार? नव्या चेहऱ्यांना संधी देणार
IND vs SA 5th T20 Playing 11: अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर? संभाव्य प्लेईंग 11
अखेर संजू सॅमसनला संधी मिळणार, जसप्रीत बुमराहचं कमबॅक, पाचव्या टी 20 मध्ये कोणाला संधी कोण बाहेर?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2025 | गुरुवार
Payal Gaming Viral Video Controversy: सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा? पोस्ट करत म्हणाली...
सुप्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा पायलचा 1 मिनिटं 20 सेकंदांचा 'तो' व्हायरल MMS खरा की खोटा?
VB-G-RAM-G: लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
लोकसभेत गोंधळामध्येच 'व्हीबी जी राम जी' विधेयक मंजूर विरोधकांनी कागदपत्रे भिरकावली
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Video: नोकरी लागत नाही, लगीन होत नाही, गाय दूध देत नाही, नवरा बायकोची भांडण होत आहेत? मग श्री राम जय जय राम म्हणा; भाजप खासदाराचा थेट संसदेतून 'सल्ला'
Embed widget